IPL 2022 : आरसीबीचा वांनदु हसरंगा आणि राजस्थानचा यजुवेंद्र चाहल यांच्यामध्ये पर्पल कॅपसाठी रस्सीखेच सुरु आहे. पंजाबविरोधात सामन्यात हसरंगाने भेदक मारा करत दोन फलंदाजांना तंबूत धाडले.. यासह हसरंगाने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. हसरंगा आणि चहलच्या नावावर 23 विकेट आहेत. इकॉनमीच्या जोरावर हसरंगाने पर्पल कॅप हिसकावली आहे.
हसरंगाने आरसीबीकडून यंदा दमदार कामगिरी केली आहे. हसरंगाने 12 सामन्यात 1.49 च्या इकॉनमीने 23 विकेट घेतल्या आहेत. तर चहलने 12 सामन्यात 7.54 च्या इकॉनमीने 23 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कुलदीप यादव आहे...कुलदीप यादवने 12 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. नटराजन 9 सामन्यात 17 विकेटसह पाचव्या क्रमांकावर आहे.
हसरंगाने चार षटकांत फक्त 15 धावा देत दोन विकेट घेतल्या. हसरंगाने पंजाबविरोधात भेदक मारा केला. हसरंगा आणि हर्षल पटेल यांच्या गोलंदाजीच्या जोरावर पंजाबला 209 धावांत रोखले.
ऑरेंज कॅप जोस बटलरकडे -
राजस्थानकडून पर्पल कॅप गेली असली.. तरी ऑरेंज कॅप अद्याप राजस्थानच्या खेळाडूकडेच आहे. राजस्थानचा विस्फोटक सलामी फलंदाज जोस बटलरने 12 सामन्यात 625 धावांचा पाऊस पाडला आहे. ऑरेंज कॅप बटलरकडेच आहे. तर राहुल 459 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेविड वॉर्नर 427 तर फाफ 389 धावांसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. गुजरातचा शुबमन गिल 384 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-
- ICC T20 World Cup, 2022 : टी20 विश्वचषकात हार्दिकसारखा अष्टपैलू भारतासाठी गरजेचा : हरभजन सिंह
- Pat Cummins : केकेआरला मोठा झटका, पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
- IPL 2022 Orange Cap : आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बटलर आघाडीवर, पाहा टॉप-5 खेळाडू