IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 70 लीग सामन्यांपैकी 59 सामने पार पडले असून बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होत आहे. दरम्यान स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) स्पर्धेतून सर्वात आधी बाहेर पडला आहे. त्यांनी 12 पैकी केवळ 3 सामने जिंकले असून 9 सामने गमावले आहेत. पण असे असतानाही संघातील काही खेळाडूंनी आपल्या खेळाची छाप क्रिकेट रसिकांवर सोडली आहे. मुंबई इंडियन्समधील हे तीन खेळाडू नेमके कोण ते पाहूया...


तिलक वर्मा


मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये चमकलेला एक युवा तारा आहे. तिलकने हंगामातील 12 सामन्यात 40.89 च्या सरासरीने आणि 132.85 च्या स्ट्राइक रेटने 368 रन केले आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही 7 व्या स्थानावर आहे. तिलकने आयपीएल 2022 मध्ये दोन अर्धशतकं झळकावली असून 61 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.


सूर्यकुमार यादव


आयपीएल 2022 च्या काही सलामीच्या सामन्यांना मुकलेला सूर्यकुमार यादव आता देखील स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर आहे. पण त्याने खेळलेल्या 8 सामन्यात 43.29 च्या सरासरीने आणि 145.67 च्या स्ट्राईक रेटने 303 रन केले. यावेळी त्याने तीन अर्धशतकं देखील ठोकली आहे. नाबाद 68 रन हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमार संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंमधील सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे.


डेवाल्ड ब्रेविस


मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने देखील काही सामने खेळले असले तरी त्यात त्याने त्याची छाप सोडली आहे. बेबी एबी नावाने प्रसिद्ध ब्रेविसने आयपीएल 2022 मध्ये 6 सामन्यात 20.67 च्या सरासरीने आणि 155.00 च्या स्ट्राईक रेटने 124 रन केले आहेत. 49 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. त्याने एक विकेटही यावेळी घेतली आहे.


हे देखील वाचा-