RCB vs PBKS : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 60 वा सामना आहे. या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (RCB vs PBKS) हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरले असून बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पंजाब संघाने बंगळुरुच्या फलंदाजांना पटापट बाद करण्यासाठी हरप्रीत ब्रारला संधी दिली आहे. संदीप शर्माला विश्रांती दिली गेली आहे. बंगळुरु संघाने मात्र एकही बदल संघात केलेला नाही. 



आयपीएलमध्ये आजवर रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता पंजाबचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 16 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरुने 13 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता बंगळुरुने आतापर्यंत 12 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह चौथं स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे पंजाब संघाने 11 पैकी 5 सामने जिंकल्याने ते गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...


बंगळुरु अंतिम 11 


फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.


पंजाब अंतिम 11 


जॉनी बेअरस्टो, मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), भानुका राजपक्षा, रिषी धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर


हे देखील वाचा-