IPL 2024 Stats & Records चेन्नई : आयपीएल 2024 (IPL 2024) चा समोराप झालेला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं ( Kolkata Knight Riders) फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादला (Sun Risers Hyderabad) पराभूत केलं आहे. केकेआरनं तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नावर कोरलं. या हंगामातील ऑरेंज कॅपचा मानकरी विराट कोहली ठरला. आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड देखील यावर्षी मोडला गेला. 250 अधिक धावा अनेकदा पाहायला मिळाल्या. विराट कोहली, ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, सुनील नरेन आणि जॅक फ्रेजर मॅक्गर्क यांनी गोलंदाजांची धुलाई केली. 


विराट कोहली


विराट कोहलीनं आयपीएलच्या 17 व्या पर्वात सर्वाधिक धावा केल्या. विराट कोहली ऑरेंज कॅपच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. विराटनं 15 मॅचमध्ये 61.75 च्या सरासरीनं  154.70 च्य स्ट्राइक रेटनं 741 धावा केल्या. विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाली. मात्र, विराट कोहलीचं आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप च्या लिस्ट मध्ये पहिल्या स्थानवर राहिला.  


ट्रेविस हेड


सनराइजर्स हैदराबादचा सलामीवीर ट्रेविस हेडसाठी यंदाचं आयपीएल शानदार राहिलं. अखेरच्या दोन मॅच वगळता ट्रेविस हेडनं धमाकेदार फलंदाजी केली. ट्रेविस हेडनं 15 मॅचमध्ये 40.50 च्या सरासरीनं 191.55 च्या स्ट्राइक रेटनं 567  धावा केल्या. क्वालिफायर-1 आणि अंतिम फेरीच्या लढतीत ट्रेविस हेडला दमदार फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं केकेआर विरुद्ध सनरायजर्स हैदराबादचा पराभव झाला.  


अभिषेक शर्मा


सनराइजर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मानं देखील आयपीएलमध्ये जोरदार फटकेबाजी केली. अभिषेक शर्मानं 16 मॅचमध्ये 32.27 च्या सरासरीनं 204.22 च्या स्ट्राइक रेटनं 484 धावा केल्या. अभिषेक शर्माच्या फलंदाजीमुळं तो देशभरात चर्चेत आला. अभिषेक शर्माच्या फलंदाजीची दखल देशभरातील माजी क्रिकेटपटूंनी घेतली. आगामी काळात अभिषेक शर्माला भारतीय संघात संधी मिळू शकते.   


सुनील नरेन

कोलकाता नाइट राइडर्सनं तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवलं. सुनील नरेन याला फलंदाजी आणि गोलंदाजीमधील दमदार कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आला. सुनील नरेननं 14 मॅचमध्ये 34.86 सरासरीनं आणि 154.70 च्या स्ट्राईक रेटनं 488 धावा केल्या आहेत. सुनील नरेननं काही सामन्यांचा अपवाद वगळता इतर मॅचेसमध्ये केकेआरला दमदार सुरुवात करुन दिली. सुनील नरेननं 33 षटकार मारले तर 50 चौकार लगावले.  


जॅक फ्रेजर मॅक्गर्क


डेविड वॉर्नर संघात असल्यानं दिल्ली कॅपिटल्सनं सुरुवातीला जॅक फ्रेजर मॅक्गर्कला संधी दिली नव्हती. मॅक्गर्कनं जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याचं सोनं करुन दाखवलं. दिल्लीसाठी जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. जॅक फ्रॅजर मॅक्गर्कनं 9 मॅचमध्ये 234.04 च्या स्ट्राइक रेटनं 330 धावा केल्या.  


संबंधित बातम्या : 


Harshal Patel : एकाही गोलंदाजाला जे जमलं नाही ते हर्षल पटेलनं करुन दाखवलं, दुसऱ्यांदा पटकावली पर्पल कॅप


IPL 2024: विराट कोहली, रोहित शर्मा ते MS धोनीपर्यंत...; पाहा आयपीएल 2024च्या हंगामातील सर्वात मोठे 5 वाद