Amitabh Bachchan on Kavya Maran : आयपीएलच्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सने (KKR)  सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघावर मिळवलेल्या एकतर्फी विजयानंतर यंदाच्या मोसमाची अखेर झाली. शाहरुख खान, जुही चावला यांच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने तब्बल 10 वर्षानंतर आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. एकीकडे कोलकाता संघाचे  पाठिराखे आणि शाहरुख खानच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त होत असताना दुसरीकडे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  यांना सनरायझर्स हैदराबाद संघाच्या पराभवाने वाईट वाटले आहे. हैदराबाद संघाची मालकीन काव्या मारन (Kavya Maran) हिच्यासाठी अमिताभ यांनी धीर देणारे शब्द व्यक्त केले आहे. 


काव्याचे अश्रू पाहून अमिताभ यांना वाईट वाटले...


कोलकाता नाईट रायडर्सने कडवी झुंज देत सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. सनरायझर्स हैदराबादच्या पराभवामुळे बिग बी देखील निराश झाले आहेत. त्यांनी आपल्या ब्लॉगवर या सामन्याबाबत आपले मत मांडले आहे. बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या मालक काव्या मारनचा उल्लेख केला आहे. काव्याला रडताना आणि तिचे अश्रू लपवताना पाहून त्याने लिहिले, 'आयपीएल फायनल संपली आणि केकेआरने सर्वात शानदार विजय मिळवला. SRH नुकताच पराभूत झाला. हैदराबादचा संघ हा चांगला संघ चांगला संघ आहे. त्यांनी इतर सामन्यात आपला जबरदस्त परफॉर्मेन्स दिला. 


काव्याच्या अश्रूवर अमिताभ यांनी काय म्हटले?


अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले की, सगळ्यात दुखद आणि वाईट म्हणजे हैदराबादच्या पराभवानंतर त्या संघाची मालकीण सुंदर तरुणीचे (काव्या मारन)  पराभवानंतर भावूक होऊन रडणे. तिने आपले अश्रू आणि रडणारा चेहरा कॅमेऱ्यापासून लपवला, जेणेकरून तिच्या या भावना कोणी पाहता कामा नये. मला तिच्यासाठी वाईट वाटते. हरकत नाही, पण उद्या आणखी एक दिवस आहे. माय डिअर आणि  अपयशी होणाऱ्यांसाठी एक सांगणे आहे, आपली हार मानू नका कारण उद्या आणखी एक दिवस आहे. 


केकेआरने विजेतेपदाचा 10 वर्षांचा दुष्काळ संपवला...


कोलकाता नाईट रायडर्सनं 2012 आणि 2014 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं होते. त्यानंतर आता 2024 मध्ये  कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद पटकावले आहे.  केकेआरने 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात आयपीएलचा हंगाम जिंकला होता. त्यानंतर आता 10 वर्षानंतर केकेआरच्या प्रशिक्षकपदी गौतम गंभीर आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :