IPL 2024: आयपीएल 2024 चा हंगाम इतर हंगामापेक्षा जास्त चर्चेत राहिला. या हंगामात अनेक विक्रम नोंदवले गेले, तर अनेक वाद देखील झाल्याचे पाहायला मिळाले.  विशेष करुन अम्पायरने दिलेल्या निर्णयावरुन अनेक खेळाडूंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या मोसमात विराट कोहलीपासून (Virat Kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि एमएस धोनीला (MS Dhoni) देखील अम्पायरचे काही निर्णय मान्य न झाल्याचे पाहायला मिळाले. या हंगामातील सर्वात मोठ्या 5 वादाबाबत जाणून घ्या...


1. विराट कोहलीचा नो बॉल वाद


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्स एप्रिलमध्ये आयपीएल 2024 च्या 36 व्या सामन्यात आमनेसामने आले होते. प्रथम खेळताना केकेआरने स्कोअरबोर्डवर 222 धावांची मोठी मजल मारली होती. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीसाठी विराट कोहलीने स्फोटक पद्धतीने 6 चेंडूत 17 धावा केल्या होत्या. पण हर्षित राणाने टाकलेल्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट मोठा शॉट खेळण्यासाठी क्रीजच्या बाहेर आला, पण चेंडू फुल टॉस होता, त्यावर कोहली झेलबाद झाला. जेव्हा चेंडू कोहलीच्या बॅटला लागला तेव्हा चेंडूची उंची स्पष्टपणे त्याच्या कमरेच्या वर होती. पण हॉक आय सिस्टीमला आढळून आले की जर कोहली क्रीजच्या आत असता तर चेंडू त्याच्या कमरेच्या खाली राहिला असता. या निर्णयावर कोहली संतापला आणि त्याने खुल्या मैदानावर पंचांशी हुज्जत घातली. अशा वर्तनासाठी कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे.


2. रोहित शर्माने ब्रॉडकास्टरवर केले आरोप


रोहित शर्माचा अभिषेक नायरसोबत बोलतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये हे शेवटचे हंगाम असणार, असं रोहित बोलताना दिसला. यानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला रामराम करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर कॅमराचा ऑडिओ बंद करावा, अशी विनंती करणार व्हिडीओ देखील रोहितचा समोर आला होता. दरम्यान, रोहितने ट्विट करून स्टार स्पोर्ट्सवर आरोप केला की, त्याच्या विनंतीनंतरही त्याचा व्हिडीओ आणि ऑडिओ लाईव्ह टीव्हीवर दाखवण्यात आला. पण आयपीएल ब्रॉडकास्टरने व्हिडीओ दाखवल्याचे मान्य केले, पण त्याचा ऑडिओ थेट टीव्हीवर प्ले केल्याचा आरोप पूर्णपणे फेटाळला.


3. एमएस धोनीच्या वाईड बॉलचा वाद


IPL 2023 चा 34 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवला गेला. चेन्नई सुपर किंग्स प्रथम फलंदाजी करत होता आणि लखनौचा गोलंदाज मोहसीन खान 18 व्या षटकात गोलंदाजी करत होता. धोनीचा एक चेंडू चुकला होता, जो चेंडू धोनीच्या बॅटखालून गेला तरीही ग्राउंड अम्पायरने त्याला वाईड घोषित केले. यानंतर लखनौने नाराजी व्यक्त केली. तसेच काहीवेळ सामनाही थांबला होता. 


4. संजीव गोयंका अन् केएल राहुलचा व्हिडीओ


आयपीएल 2024 च्या 57 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी झाला. लखनौविरुद्धचा हा सामना हैदराबादने 62 चेंडू बाकी असताना 10 गडी राखून सामना जिंकला. सामन्यानंतर, एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामध्ये लखनौचे मालक संजीव गोयंका कर्णधार केएल राहुलवर चिडले होते. तसेच प्रशिक्षक जस्टिन लँगरशीही बोलले. राहुल शांतपणे संजीव गोयंका यांचं ऐकत होता.  या व्हिडीओनंतर अनेक दिग्गजांपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनी संघ मालकांना आयपीएलमध्ये त्यांच्या मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला होता.


5. संजू सॅमसनचा झेल


आयपीएल 2024 चा 56 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीने प्रथम खेळताना 221 धावा केल्या होत्या आणि लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने 86 धावा केल्या होत्या. या सामन्याचे 16 वे षटक सुरू होते, त्यामध्ये सॅमसनने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या शाई होपने झेल पकडला. या झेलचा अनेक वेळा रिप्ले पाहण्यात आला आणि संजू सॅमसनला बाद दिले. अनेकांनी  शाई होपचा पाय बाऊंड्री लाईनला स्पर्श झाल्याचे सांगितले. मात्र होपचा पाय सीमारेषेला स्पर्श करत नसल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. महत्त्वाच्या वेळी सॅमसन बाद झाल्याने राजस्थानने हा सामना 20 धावांनी गमावला.


संबंधित बातम्या:


IPL 2024 Catch Of The Season: चित्यासारखी धाव, बिबट्यासारखी झेप; यंदा रमणदीप 'Catch Of The Season'चा ठरला मानकरी, पाहा Video


IPL 2024 Final Prize Money KKR vs SRH: विजेता, उपविजेता, इमर्जिंग प्लेअर, ऑरेंज- पर्पल कॅप; कोणाला किती रुपये मिळाले?, पाहा A to Z माहिती


 IPL 2024 All Records: आयपीएलचा इतिहास, भूगोल सगळंच बदलून टाकलं; 2024 च्या हंगामात झाली '14 भीमपराक्रमाची' नोंद