Virat Kohli : रनमशीन विराट कोहली यंदाच्या हंगामात खोऱ्यानं धावा काढतोय. पंजाबविरोधात विराट कोहलीनं झंझावती 92 धावांची खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. विराट कोहलीच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने 241 धावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीने 92 धावांची खेळी करत यंदाच्या हंगामात मोठा पराक्रम केला आहे. विराट कोहलीने 600 धावांचा पल्ला पार केला आहे. यंदाच्या हंगामात 600 धावांचा पल्ला पार करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरलाय. विराट कोहलीचा ऑरेंज कॅपवर दावा अधिक भक्कम झाला आहे.
यंदाच्या हंगामात विराटची कामगिरी -
विराट कोहलीने यंदाच्या हंगामात आपल्या फलंदाजीने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. विराट कोहलीने 12 सामन्यात 634 धावांचा पल्ला पार केला आहे. विराट कोहलीने यंदाच्या हंगामात 154 च्या स्ट्राईक रेटने आणि 71 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने यंदाच्या हंगामात एक शतक आणि पाच अर्धशतके ठोकली आहेत. त्याशिवाय विराट कोहलीने 30 षटकार आणि 55 चौकार ठोकले आहेत.
ऑरेंज कॅप कोहलीकडेच -
विराट कोहलीने 92 धावांची खेळी करत ऑरेंज कॅपवरील दावा मजबूत केला आहे. विराट कोहली 634 धावांचा पाऊस पाडलाय. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऋतुराज गायकवाडने 11 सामन्यात 541 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या हेडच्या नावावर 533, संजूच्या नावावर 471 धावा आहेत. नारायण पाचव्या क्रमांकावर आहे, त्याच्या नावावर 461 धावा आहेत.
विराटची 92 धावांची खेळी -
पंजाबविरोधात विराट कोहलीने 92 धावांची शानदार खेळी केली. पहिल्याच षटकात विराट कोहलीचा झेल सुटला. पण त्यानंतर विराट कोहलीने आपला करिश्मा दाखवला. विराट कोहलीने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली, पण त्यानंतर त्याने चौफेर फटकेबाजी केली. विराट कोहलीने 47 चेंडूमध्ये 92 धावांचा पाऊस पाडला. विराटने आज 196 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. विराटने आपल्या खेळीमध्ये सहा षटकार आणि सात चौकार लगावले.
सर्वाधिक षटकार कुणाच्या नावावर -
यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. विराट कोहलीने यंदाच्या हंगाात 30 षटकार ठोकले आहेत. सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजात अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे, त्याने 65 षटकार ठोकले आहेत. नारायण याने 32 तर हेडने 31 षटकार लगावले. क्लासेन याने 31 षटकार लगावलेत.