virat kohli IPL century : जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानावर किंग विराट कोहलीने शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतरही आरसीबीला (RR vs RCB) पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या शतकावर राजस्थानच्या जोस बटलरचं शतक वरचढ ठरलं. विराट कोहलीला आरसीबीच्या इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही, परिणामी आरसीबीला 200 धावांचा पल्ला पार करता आला नाही. आरसीबीच्या पराभवानंतर विराट कोहलीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. नेटकऱ्यांकडून विराट कोहलीला सेल्फिश म्हटलं जातेय. विराट कोहली सेल्फिश असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. विराट कोहलीची खेळी अनेकांना संथ वाटली, त्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले. विराट कोहली संघासाठी नाही, तो स्वत:च्या माईलस्टोनसाठी खेळतो, असाही टोला काही नेटकऱ्यांनी लगावला आहे. 


विराट कोहलीचे आयपीएलमधील संथ शतक  - 


 विराट कोहलीने जयपूरमध्ये शनिवारी राजस्थानविरोधात शतकी धमाका केला. पण  विराट कोहलीने या शतकासाठी तब्बल 67 चेंडू खर्च केले. विराट कोहलीचं आयपीएलमधील हे आठवे शतक ठरलं. सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर पोहचला. पण विराट कोहलीचे हे विक्रमी शतक आयपीएलमधील सर्वात संथ शतक ठरलं आहे. विराट कोहलीने मनिष पांडेच्या संथ शतकी खेळीची बरोबरी केली.  2009 मध्ये मनिष पांडे याने दिल्लीविरोधात 67 चेंडूमध्ये शतक ठोकले होते. आता विराट कोहलीने या संथ शतकी खेळीची बरोबरी केली. 










विराट एकटाच लढला - 


जयपूरमध्ये राजस्थानविरोधात विराट कोहली एकटाच लढला. दुसऱ्या बाजूने विराट कोहलीला साथ मिळाली नाही. विराट कोहलीने राजस्थानविरोधात 72 चेंडूमध्ये नाबाद 113 धावांची खेळी केली. यामध्ये 12 चौकार आणि चार षटकाराचा समावेश होता.आरसीबीच्या दुसऱ्या फलंदाजांकडून साथ मिळाली नाही, त्यामुळेच विराट कोहलीची खेळी संथ ठरली. विराट कोहलीला या संथ खेळीनंतर टीकेचा सामना करावा लागत आहे. 







विराट कोहली आणि फाफ यांनी शानदार सुरुवात केली. पण विराट कोहलीच्या संथ खेळीमुळे फाफवर दबाव वाढला, त्यामध्ये त्याने विकेट फेकली, अशीही टीका काही नेटकऱ्यांनी केली आहे. विराट कोहलीने 90 ते 100 धावांच्या दरम्यान खूप चेंडू खर्च केले, त्यामुळेही विराट कोहलीला सेल्फिस म्हटलं जातेय. विराट कोहलीला सेल्फिश म्हणण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही विराट कोहलीला सेल्फिस म्हणून ट्रोल कऱण्यात आले आहे.