जयपूर : आयपीएलमध्ये(IPL 2024) आज झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) सहा विकेटनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bengaluru) पराभूत केलं. बंगळुरुनं दिलेलं १८३ धावांचं आव्हान राजस्थाननं सहजरित्या पार केलं. राजस्थान रॉयल्सकडून कॅप्टन संजू सॅमसन यानं ६९ धावा केल्या तर सलामीवीर जोस बटलरनं १०० धावा केल्या. आजच्या मॅचच्या निकालानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत फेरबदल झाले आहेत.याशिवाय पर्पल कॅप देखील नव्या खेळाडूकडे  गेली आहे. राजस्थानचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. 


ऑरेंज कॅप कुणाकडे :


यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आरसीबीचा आक्रमक फलंदाज विराट कोहली आहे. विराट कोहलीनं पाच मॅचमध्ये एका शतकासह दोन अर्धशतकांच्या जोरावर ३१६ धावा केल्या आहेत. विराट कोहली नंतर राजस्थानचे दोन फलंदाज या शर्यतीत आहेत. रियान परागनं  १८५ धावा केल्या आहेत.  तर, संजू सॅमसन तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानं १७८ धावा केल्या आहेत. 


पर्पल कॅप कुणाकडे?


आजच्या मॅचनंतर ऑरेंज कॅपमध्ये बदल झाला नसला तरी पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे गेली आहे. आज युजवेंद्र चहल यानं आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिसला बाद करुन पर्पल कॅप मिळवली. चहलनं आजच्या मॅचमध्ये एक विकेट घेतली. चहलच्या नावावर आयपीएलमध्ये ८ विकेट आहेत. चहलनंतर या शर्यतीत गुजरात टायटन्सचा खेळाडू मोहित शर्मा आहे. त्याच्या नावावर ७ विकेट आहेत.मुस्तफिजूर रहमान याच्या नावावर देखील ७ विकेट असून तो सध्या मायदेशी परतला असल्यानं तो शर्यतीत राहणार की नाही हे पाहावं लागेल. आजच्या मॅचमध्ये चहलला एक विकेट मिळाल्यानं मोहित शर्माकडे असणारी पर्पल कॅप चहलकडे आली आहे. 


राजस्थानचा बंगळुरुवर विजय पण कोलकाताला धक्का


गुणतालिकेत राजस्थान आणि बंगळुरु यांच्यातील मॅचपूर्वी कोलकाता सहा गुणांसह नेट रनरेटच्या जोरावर पहिल्या स्थानावर होता. मात्र, राजस्थान रॉयल्सनं आज झालेल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करत आणखी दोन गुण मिळवले. या दो गुणांच्या जोरांवर राजस्थान रॉयल्स ८ गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचलं आहे. आता तीन मॅचमधील विजयांसह कोलकाताचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. 


आरसीबीचा चौथा पराभव


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला यंदाच्या आयपीएलमध्ये चौथा पराभव स्वीकारावा लागला आहे. आरसीबीला आजच्या मॅचमध्ये विजय मिळवून कमबॅक करायचं होतं. मात्र, बंगळुरुच्या स्वप्नांवर संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी पाणी फिरवलं आहे. 


संबंधित बातम्या :


IPL 2024, RR vs RCB : बटलरनं धोनीच्या स्टाइलनं सिक्स मारत मॅच संपवली, राजस्थानचा विजयाचा चौकार, विराटचं शतक व्यर्थ


Virat Kohli :आयपीएलसाठी स्पेशल लूक, विराट कोहली एका हेअर कटसाठी किती रुपये मोजतो? लाखो रुपये फी घेणारा हेअर स्टायलीस्ट म्हणतो..