Vijay Shankar Half Century : वानखेडेच्या मैदानावर शनिवारी अजिंक्य राहणे याने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. रविवारी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विजय शंकर याने कोलकात्याच्या गोलंदाजांची पिटाई केली. गुजरातच्या विजय शंकर याने अखेरच्या दोन षटकात धावांचा पाऊस पाडला. आघाडीचे फंलदाज बाद झाल्यानंतर विजय शंकर याने मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडत तांडव घातला. विजय शंकर याने अखेरच्या दोन षटकात धावांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या 24 चेंडूत 63 धावांची खेळी करत फिनिशिंग टच दिला. विजय शंकरच्या विस्फोटक खेळीच्या बळावर गुजरातने दोनशे धावांचा पल्ला पार केला. विजय शंकर याने 24 चेंडूत पाच षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली.
विजय शंकर याने अखेरच्या दोन षटकातील 11 चेंडूत 41 धावांचा पाऊस पाडला. विजय शंकरच्या विस्फोटक फलंदाजीमुळे डेविड मिलर बघ्याच्या भूमिकेत होता. विजय शंकर आणि डेविड मिलर यांच्यामध्ये पाचव्या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी झाली. ही भागादारी अवघ्या 15 चेंडूत झाली होती. यामध्ये विजय शंकर याचा वाटा 46 धावांचा होता. विजय शंकर याने मौदानाच्या चोहोबाजूने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. विजय शंकर याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे गुजरातचा संघ दोनशे धावांपर्यंत मजल मारु शकला. 17 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर गुजरात संघाच्या 150 धावा झाल्या होत्या. त्यानंतर विजय शंकर याने तांडव घातले. विजय शंकर याने त्यानंतर 11 चेंडूत 41 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये चार षटकारांच समावेश आहे.
विजय शंकर याच्या विस्फोटक फलंदाजीनंतर सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकजण मिम्स तयार करत आहेत. पाहा नेटकरी काय म्हणतात....
IPL 2023, Match 13, GT vs KKR : साई सुदर्शन आणि विजय शंकर यांच्या अर्धशतकाच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 204 धावांपर्यंत मजल मारली. विजय शंकर याने कोलकात्याला विजयासाठी 205 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. विजय शंकर याने अखेरच्या षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. विजय शंकर याने 24 चेंडूत 63 धावांची वादळी खेळी केली.