GT vs KKR IPL 2023 : नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात आणि कोलकाता यांच्यामध्ये आयपीएलचा 13 वा सामना सुरु आहे. या सामन्यात आज गुजरातचा नियमीत कर्णधार खेळत नाही. गुजरातकडून आज राशिद खान नाणेफेकीसाठी आला होता. राशिद खान याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी राशिद खान याने हार्दिक पांड्या आजच्या सामन्यात का खेळत नाही, याचे कारण सांगितले.
हार्दिक पांड्याची तब्येत व्यवस्थित नाही, त्यामुळे तो आजचा सामना खेळत नाही, असे राशिद खान याने नाणेफेकीवेळी सांगिंतले. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत आज राशिद खान संघाचे नतृत्व करत आहे. नाणेफेक झाल्यानंतर राशिद म्हणाले की, आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक वाटत आहे. चांगली धावसंख्या उभारु... हार्दिक पांड्या आज खेळत नाही, त्याची तब्येत ठीक नाही. आम्ही हार्दिकसोबत कोणताही रिस्क घेणार नाही. पुढील सामन्यापर्यंत हार्दिक पांड्या तंदुरुस्त होईल. आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हार्दिक पांड्याच्या जागी प्लेईंग 11 मध्ये विजय शंकर याला स्थान देण्यात आले आहे. दरम्यान कोलकात्याकडूनही संघात दोन बदल करण्यात आले आहेत. कोलकात्याने लॉकी फर्गुसनला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. त्याशिवाय एन जगदीशन यालाही खेळवलेय. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11..
गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन
वृद्धीमान साहा (w), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान (कर्णधार), मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ, यश दयाल
केकेआर प्लेईंग इलेव्हन
रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकुर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्यूसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
GT vs KKR, Head to Head : कुणाचं पारड जड?
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात आतापर्यंत एकच सामना खेळवण्यात आला आहेत. यामध्ये कोलकाताचं पारड जड होतं. कोलकाता नाईट रायडर्स संघाने गुजरात टायटन्स विरुद्धचा (KKR vs GT) सामना जिंकला होता.