Ruturaj Gaikwad Fastest Indian to Complete 3000 Runs in T20 : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) टी20 क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऋतुराज गायकवाड टी20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) हा 3000  धावा पूर्ण करणारा सर्वात जलद भारतीय फलंदाज बनला आहे. शनिवारी आयपीएल 2023 मध्ये मुंबई विरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने नवा विक्रम रचला. या सामन्यात त्याने केएल राहुलचा (KL Rahul) विक्रम मोडला. ऋतुराजने केएल राहुलचा सर्वात जलद 3000 टी20 धावा करण्याचा विक्रम मोडत नवा विक्रम स्वत: च्या नावे केला आहे.


टी 20 मध्ये ऋतुराज गायकवाडची जबरदस्त कामगिरी


आयपीएल 2023 च्या बाराव्या सामन्यात मुंबई विरुद्ध खेळताना ऋतुराजने 15 धावा करताच हा विक्रम आपल्या नावावर केला. महाराष्ट्राच्या या फलंदाजाने 91 टी-20 डावात 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड टी20 मध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारा स्फोटक फलंदाज ठरला आहे. त्याने केएल राहुलला मागे टाकलं.


ऋतुराज गायकवाडनं केएल राहुलला टाकलं मागे


याआधी सर्वात जलद 300 धावांचा विक्रम केएल राहुलच्या नावावर होता. त्याने 93 डावात 3000 टी20 धावा पूर्ण केल्या. त्याला मागे टाकत ऋतुराजने 91 सामन्यांमध्ये सर्वात जलद 3000 टी20 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. टी 20 मध्ये सर्वात जलद 3000 धावा करणाऱ्या जागतिक खेळाडूंच्या यादीत ऋतुराज गायकवाड चौथ्या क्रमांकावर आहे.


सर्वात जलद 3000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज


आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये ऋतुराज गायकवाडच्या बॅट तळपताना दिसत आहे. ऋतुराज चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिल्याच सामन्यात ऋतुराज गायकवाडने गुजरात टायटन्सविरुद्ध 92 धावांची दमदार खेळी केली. शनिवारीही मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने 36 चेंडूत 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीनंतर ऋतुराज गायकवाड सर्वात जलद 3000 टी20 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. त्यानं केएल राहुलला पिछाडीवर टाकलं आहे.


आयपीएलमध्ये दमदार खेळी


ऋतुराज गायकवाडने आयपीएलच्या इतिहासात उत्तुंग षटकार ठोकले आहेत. यंदाच्या मोसमात म्हणजे आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) ऋतुराज चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ऋतुराजने तीन सामन्यांमध्ये दमदार खेळी करत 14 षटकार ठोकले आहेत. गेल्या मोसमात आयपील 2022 मध्ये 14 सामन्यात त्याने 14 षटकार ठोकले होते. तर त्याआधीच्या आयपीएल 2021 मध्ये ऋतुराजने 16 सामन्यांमध्ये 23 षटकार ठोकले होते. इतकंच नाही तर आयपीएल 2021 मध्ये ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ruturaj Gaikwad in IPL : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा IPL मध्ये दंगा! पाडला षटकारांचा पाऊस, धमाकेदार कामगिरीचीही चर्चा