IPL Media Rights: इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) सामने म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असते. क्रिकेटवेड्या भारतात आयपीएल सामने बघणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये आहे. त्यामुळे हे सामने प्रक्षेपण (IPL Media Rights) करण्याची संधी कोणत्या कंपनीला मिळणार, यासाठी देखील लिलाव घेण्यात येतो. दरम्यान 2023 ते 2027 पर्यंतच्या आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलावप्रक्रिया (IPL Media Rights Auction 2022) नुकतीच पार पडली असून यातून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने (BCCI) तब्बल 48 हजार कोटी 390 रुपये मिळवले आहेत.


यावेळी भारतातील  टीव्ही मीडिया राईट्सच्या शर्यतीत डिजनी स्टारने (Disney Star) तर डिजीटल हक्कांसाठी वायकॉम 18 ने (Viacom18) बाजी मारली आहे. त्यामुळे टीव्हीवर आयपीएलचे सामने हे स्टार स्पोर्ट्सवरच दिसणार असून ऑनलाईन सामने मात्र वूट (Voot) वर पाहावे लागणार आहेत. याशिवाय पॅकेज सी ज्यामध्ये एका सीजनच्या 18 निवडक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असणार आहेत. ते वायकॉम 18 ने विकत घेतले आहे. याशिवाय परदेशात आयपीएल सामन्यांचे प्रसारण करण्यासाठीचे पॅकेज डी वायकॉम 18 आणि टाईम्स इंटरनेट यांनी मिळून विकत घेतले आहेत. या सर्वाबाबतची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी ट्वीट करत दिले आहेत. या लिलावानंतर आयपीएळ जगातील दुसरी सर्वात महागडी लीग झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


 


कुठलं पॅकेज कितीला?


आयपीएलच्या पुढील पाच हंगामासाठी म्हणजेच 2023 ते 2027 या कालावधीत आयपीएल प्रसारण हक्कांसाठीची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. भारतीय उपखंडासाठी टिव्ही आणि डिजिटल हक्क, तसंच प्लेऑफच्या निवडक सामन्यांसाठीचे हक्क आणि परदेशात आयपीएळ सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क अशा एकूण चार पॅकेज्सची विक्री यावेळी झाली. हा संपूर्ण व्यवहार 48 हजार 390 कोटींमध्ये झाला आहे. यावेळी टीव्हीसाठीचे हक्क डिजनी स्टारने आपल्याकडे कायम ठेवले यासाठी त्यांनी 23 हजार 575 कोटी रुपये मोजले. तर डिजीटल प्लॅटफॉर्मसाठीचे हक्क 20 हजार 500 कोटींना वायकॉम 18 कंपनीला विकले गेले आहेत. आयपीएलच्या 410 सामन्यांसाठी या हक्कांची विक्री झाल्याने एका सामन्यातून जवळपास 107 कोटींची कमाई बीसीसीआय करणार आहे. यामध्ये टीव्हीच्या माध्यमातून एका सामन्यांतून जवळपास 57 कोटी तर डिजीटल प्लॅटफॉर्मवर एका सामन्यातून 50 कोटींची कमाई बीसीसीआय करेल. याशिवाय पॅकेज सीमध्ये एका सीजनच्या 18 निवडक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असणार आहे. हे पॅकेज वायकॉम 18 ने 2 हजार 991 कोटींना विकत घेतले आहे. तर तर चौथं पॅकेज ज्यात भारतीय उपमहाद्वीपच्या बाहेरील टीव्ही आणि डिजीटल ब्रॉडकास्टचे राइट्स असतील. हे पॅकेज वायकॉम 18 आणि टाईम्स इंटरनेट यांनी मिळून 1 हजार 324 कोटींना विकत घेतले आहे.



हे देखील वाचा-