Rohit Sharma Video : मुंबई नगरीने जागतिक क्रिकेटला मोठमोठे दिग्गज दिले आहेत. यात गावस्कर, तेंडुलकरांपासून अनेकांचं नाव आहे. सध्या भारतीय संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) हा देखील मुंबईचाच असून बोरीवलीच्या गल्ल्यांमध्येच त्याने क्रिकेटचे धडे गिरवले. तर हाच रोहित आता पुन्हा एकदा गल्ली क्रिकेटचा आनंद घेताना दिसून आला आहे.


मुंबईत वरळीच्या एका गल्लीमध्ये रोहित शर्मा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रोहित काही मुलांसोबत अगदी कॅज्युवल कपड्यांवर क्रिकेट खेळत आहे. विशेष म्हणजे यावेळी स्टम्प्स म्हणून रस्त्याच्या कामात लागणारे ट्रॅफिक कोन लावण्यात आले आहेत. रोहित वापरत असलेली बॅटही अगदी साधी गल्ली क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारीच असल्याचंही दिसत आहे. यावेळी रोहितने खेचलेला एक दमदार शॉट हाही त्याचा फेव्हरेट पुल शॉटच (Rohit Sharma Pull Shot) आहे. 


पाहा व्हिडीओ -






रोहित शर्माची आयपीएल 2022 मधील कामगिरी


तब्बल पाच वेळा आयपीएलचा खिताब जिंकणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. त्यामुळे आयपीएलमधील (IPL) सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा हाच आहे. पण हा रोहित यंदा मात्र खास कामगिरी करु शकला नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित 1-2 सामने सोडल्यास अगदी खास कामगिरी करु शकलेला नाही. रोहितने 14 सामन्यातील 14 डावात 19.14 च्या सरासरीने आणि 120.17 च्या स्ट्राईक रेटने 268 रन केले. 48 हा त्याचा सर्वोच्च स्कोर असल्याने त्याने एकही अर्धशतक ठोकलं नाही.


हे देखील वाचा-