Venkatesh Iyer : वानखेडेच्या मैदानावर वेंकटेश अय्यर याने दमदार शतक झळकावले. अय्यरच्या शतकी खेळीच्या बळावर कोलकात्याने निर्धारित २० षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 185 धावांपर्यंत मजल मारली. यंदाच्या हंगामातील दुसरे शतक वेंकटेश अय्यरच्या बॅटमधून निघाले. पहिले शतक हॅरी ब्रूक याने झळकावले होते. वेंकटेश अय्यर याने 51 चेंडूत शतकी खेळी केली. कोलकात्यासाठी हे फक्त दुसरे शतक होय.. सोळा वर्षात कोलकात्यासाठी फक्त दोन शतके झळकावण्यात आली आहेत. पहिले शतक आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात म्हणजे 2008 मध्ये आले होते..त्यानंतर कोलकात्याला दुसऱ्या शतकासाठी 2023 ची वाट पाहावी लागली.
वानखेडेच्या मैदानावर वेंकटेश अय्यर याने पहिल्या चेंडूपासूनच धावांचा पाऊस पाडला. वेंकटेश अय्यर याने 51 चेंडूत 104 धावांची खेळी केली. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला वेंकटेशने धावांचा पाऊस पाडला. वेकंटेशने आपल्या शतकी खेळीत नऊ षटकार आणि सहा चौकार लगावले. वेंकटेश अय्यरच्या शतकी खेळीला रायली मेरिडेथ याने संपुष्टात आणले. विशेष म्हणजे.. आयपीएलच्या सोळा वर्षात कोलकात्यासाठी हे फक्त दुरे शतक होय... २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ब्रॅडन मॅक्युलम याने १५८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर कोलकात्याकडून एकही शतक झळकावण्यात आले नव्हते. आज वेंकटेश अय्यर याने शतकी खेळी करत कोलकात्याचा शतकी दुष्काळ संपुष्टात आणला.
वेंकटेश अय्यर याच्या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेटकरी वेंकटेश अय्यर याचे कौतुक करत आहेत.