Arjun Tendulkar IPL Debut : मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई नियमीत कर्णधार रोहित शर्माशिवाय मैदानत उतरली आहे. मुंबईचे नेतृत्व आज सूर्युकमार यादव याच्याकडे आहे.  या संघामध्ये आज बरेच बदल पाहायला मिळाले. अर्जुन तेंडुलकर यालाही प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे. मागील दोन हंगामापासून अर्जुन तेंडुलकर मुंबई संघाचा सदस्य आहेत. पण त्याला अद्याप पदार्पण करता आले नव्हते. आज अर्जुनला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे.

  


अर्जुन तेंडुलकर डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. रणजी चषकात त्याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले होते. तो मागील काही वर्षांपासून मुंबईच्या संघासोबत आहे. त्याच्या खेळामध्ये मोठी सुधारणा झाल्याचे दिसतेय. गोलंदाजीसोबत तळाला तो मोठी फटकेबाजीही करतो. त्यामुळे आज अर्जुन मैदानावर  कशी कामगरी करतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.  










मुंबई इंडियन्स रोहित शर्माशिवाय मैदानात!


IPL 2023 MI vs KKR : आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स  सामना सुरु आहे. दरम्यान, मुंबई संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाता संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरला आहे. मुंबई संघासाठी महत्त्वाची बाब म्हणजे आज संघ कर्णधार रोहित शर्माशिवाय खेळत आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा आजचा सामना खेळणार नाही. वानखेडे स्टेडिअमवर रंगणाऱ्या सामन्या आधी मुंबईच्या संघात काही बदल करण्यात आले आहेत. सूर्युकमार यादव संघाचे नेतृत्व करत आहे.


MI vs KKR Playing 11: दोन्ही संघांची प्लेईंग 11


MI Playing 11: मुंबई प्लेईंग 11


कॅमेरॉन ग्रीन, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जून तेंडूलकर, हृतिक शोकीन, पीयूष चावला, ड्युआन जेनेसन, रिले मेरेडिथ


KKR Playing 11: कोलकाता संभाव्य प्लेईंग 11


व्यंकटेश अय्यर, रहमानउल्ला गुरबाज, सुनील नारायण, नितीश राणा (कर्णधार),एन जगदीशन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकूर, एल फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.



महत्त्वाच्या इतर बातम्या :


MI vs KKR, IPL 2023 Live : मुंबई आणि कोलकात्यामध्ये लढाई, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर