IPL 2023 MI vs KKR : आज आयपीएलमध्ये (IPL 2023) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात थोड्याच वेळाच सामना रंगणार आहे. दरम्यान, मुंबई (MI) संघाने नाणेफेक जिंकून (MI Won Toss) पहिल्यांदा गोलंदाजी (MI Choose to Bowl) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाता (KKR) संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरला आहे. मुंबई संघासाठी महत्त्वाची बाब म्हणजे आज संघ कर्णधार रोहित शर्माशिवाय खेळत आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा आजचा सामना खेळणार नाही. वानखेडे स्टेडिअमवर रंगणाऱ्या सामन्या आधी मुंबईच्या संघात काही बदल करण्यात आले आहेत.


वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?


आयपीएल 2023 मध्ये 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 चा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही असाच प्रकार घडला आहे. येथील सपाट विकेटवर गोलंदाजांना विशेष मदत मिळत नाही. येथील सीमा लहान आहेत आणि आऊटफिल्ड खूप वेगवान आहे.






MI vs KKR Playing 11: दोन्ही संघांची प्लेईंग 11


MI Playing 11: मुंबई प्लेईंग 11


कॅमेरॉन ग्रीन, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जून तेंडूलकर, हृतिक शोकीन, पीयूष चावला, ड्युआन जेनेसन, रिले मेरेडिथ


KKR Playing 11: कोलकाता संभाव्य प्लेईंग 11


व्यंकटेश अय्यर, रहमानउल्ला गुरबाज, सुनील नारायण, नितीश राणा (कर्णधार),एन जगदीशन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकूर, एल फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.


IPL 2023, MI vs CSK : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


MI vs KKR, IPL 2023 Live : मुंबई आणि कोलकात्यामध्ये लढाई, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर