Nitish Rana Fined Rs 24 Lakh : कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच, KKR नं IPL 2023 चा 61 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध जिंकला. पण तरी केकेआरला BCCI नं दंड ठोठावला आहे. बोर्डानं कर्णधार नितीश राणाला 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. KKR नं IPL 2023 मध्ये दुसऱ्यांदा IPL च्या आचारसंहितेचा भंग केला आहे. केकेआर संघाला स्लो ओव्हर रेटसाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे.


आयपीएल 2023 मध्ये केकेआरचं स्लो ओव्हर रेटचं हे दुसरं प्रकरण आहे. त्यामुळे कर्णधार नितीश राणाला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर संघातील सर्व सदस्यांना मॅच फीच्या 25-25 टक्के किंवा प्रत्येकी 6 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. केकेआरनं चेन्नईविरुद्ध वेळेत शेवटची ओव्हर टाकली नाही. याचा फटका संघाला बसला आहे. कारण केवळ 4 फिल्डर्स 30 यार्डच्या परिघाबाहेर होते. त्यामुळे स्लो ओव्हर रेटसाठी केकेआरला बीसीसीआयनं 24 लाखांचा दंड ठोठावला आहे. 


यापूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल 2023 च्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या 53 व्या लीग सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला होता. त्यावेळी कर्णधार नितीश राणाला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र दुसऱ्यांदा त्याच गुन्ह्यासाठी संघासह कर्णधाराला दुप्पट दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळेच आयपीएलच्या आयोजकांनी नितीश राणाला 24 लाख रुपये आणि संघातील सर्व सदस्यांना प्रत्येकी 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.


पुन्हा IPL च्या आचारसंहितेचा भंग केला, तर... 


नितीश राणा आणखी एका सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला तर त्याला सीरिजमधील एका सामन्याच्या बंदीला सामोरं जावं लागेल. मात्र, आता फक्त एकच सामना शिल्लक आहे आणि जर त्या सामन्यातही स्लो ओव्हर रेट असेल, तर राणाला फक्त दंड भरावा लागेल, कारण क्वॉलिफायर सामन्यांसाठी IPL च्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कोणत्याही खेळाडूवर बंदी घालता येणार नाही. अशा परिस्थितीत कॅप्टन नितीश राणा याच्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.


कोलकातानं धोनीच्या चेन्नईला नमवलं 


145 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात निराशाजनक झाली. दीपक चहरने कोलकात्याला सुरुवातीलाच तीन धक्के दिले. कोलकात्याला सुरुवात अतिशय खराब मिळाली. रहमनुल्लाह गुरबाज एक धाव काढून बाद झाला. गुरबाजनंतर वेंकटेश अय्यरही लगेच तंबूत परतला. वेंकटेश अय्यर याने दोन चौकारांसह नऊ धावांची खेळी केली. वेंकटेश अय्यर बाद झाल्यानंतर जेसन रॉयही लगेच तंबूत परतला. पावरप्लेमध्ये कोलकात्याचे प्रमुख तीन फलंदाज बाद झाले होते. दीपक चहर याने भेदक मारा करत कोलकात्याची आघाडीची फळी तंबूत धाडली. चेन्नईचा संघ येथून सामन्यात बाजी मारणार असे वाटले पण रिंकू सिंह आणि नीतीश राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :