15 Years of IPL: जगातील सर्वात भव्य अशी क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रिमीयर क्रिकेट लीग अर्थात आयपीएल (IPL). जगातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं या स्पर्धेत खेळण्याचं. आज याच महान क्रिकेट स्पर्धेला 15 वर्षे झाली असून 2008 मध्ये या स्पर्धेचा पहिला सामना आजच्याच दिवशी खेळवण्यात आला होता. बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी मैदानात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (KKR vs RCB) या दोन संघात हा सामना पार पडला होता. दरम्यान आयपीएलच्या 15 व्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक खास व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये आय़पीएलच्या प्रवासाच्या आठवणी दिसत आहेत.


आयपीएलच्या 15 वर्षांच्या प्रवासाबद्दलचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओमध्ये फॅन्स आयपीएलच्या इतिहासातील खास क्षणांना पाहू शकतात. व्हिडीओची सुरुवात पहिल्याच सामन्यात केकेआरच्या ब्रँडन मॅक्युलमने ठोकलेल्या 158 धावांच्या खेळीने होते. तसंच सचिनचं पहिलं आयपीएल शतकही या व्हिडीओत आहे. अशा अनेक खास आठवणींनाै उजाळा या व्हिडीओतून देण्यात आला आहे.



2008 मध्ये सुरु झाली होती आयपीएल


आयपीएलचा यंदा 15 वा सीजन सुरु असून पहिला सीजन 2008 मध्ये खेळवण्यात आला होता. आयपीएल 2008 चं आयोजन 18 एप्रिल ते 1 जून यादरम्यान करण्याक आलं होतं. यावेळी एकूण आठ संघ सामिल होते. यावेळी 59 लीग सामने खेळवण्यात आले होते. या आयपीएलचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. रहा सामना राजस्थानने शेन वॉर्नच्या कर्णधारीखाली तीन विकेट्सनी जिंकला होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक विजय हे मुंबई इंडियन्स संघाच्या नावावर असून त्यांनी पाच वेळा कप उचलला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये लखनौ आणि गुजरात हे दोन नवे संघ सामिल झाल्यामुळे 10 संघात आयपीएल चषक मिळवण्याची चुरस आहे.


हे देखील वाचा-