David Miller Birthday Video : दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला सात विकेट्सनं पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात डेव्हिड मिलरनं (David Miller) महत्वाची भूमिका बजावली. त्याने 64 धावांची नाबाद खेळी केली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा विजय सोपा झाला. दरम्यान याच मिलरचा आज वाढदिवस असून त्याला आयपीएलचा संघ राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.


यंदा मिलर गुजरात टायटन्स संघातून आयपीएल खेळला. पण आधी तो राजस्थान रॉयल्समध्ये असल्यान अजूनही त्याचं खास नातं राजस्थान संघाशी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर राजस्थान संघाने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मिलर बर्थडे सेलिब्रेशनला घालतात ती टोपी घातल्याचं दिसत आहे. अर्थात हा व्हिडीओ जुना असला तरी राजस्थानने खास पद्धतीने मिलरला शुभेच्छा दिल्याने या व्हिडीओवरही अनेक कमेंट्स येत आहेत.


पाहा व्हिडीओ -



 मिलरने एबी डिव्हिलियर्सला टाकलं मागं


मिलरच्या तुफान खेळीमुळे त्यासला सामनीवर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसेच दक्षिण आफ्रिकेकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेसाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता. मिलरनं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आठव्यांदा सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. यापूर्वी एबी डिविलियर्स याच्या नावं हा विक्रम होता. त्यानं सात वेळा टी20 क्रिकेटमध्ये सामनावीर होण्याचा मान मिळवला होता. परंतु आता मिलरनं त्याला मागं टाकलं आहे. 


हे देखील वाचा-