MP Gautam Gambhir Lucknow Super Giants Mentor : लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा मेंटॉर गौतम गंभीरला (Gautam Gambhir) आयपीएलमध्ये काम करत असल्यामुळे टीकेचा सामना करावा लागला. गौतम गंभीरने कोलकात्याला दोन वेळा आयपीएल चषक जिंकून दिलाय. आयपीएल आणि आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीरने काही काळासाठी समालोचनही केले. यंदा गौतम गंभीरने लखनौ सुपर जायंट्सच्या मेंटॉरची भूमिका यशस्वी पार पाडली. खासदार असताना आयपीएलमध्ये काम करत असल्यामुळे गौतम गंभीरला टीकेचा सामना करावा लागला. त्याला सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत प्रश्न विचारला. तसेच टीकाही केली. याला गौतम गंभीरने जशास तसे उत्तर दिलेय. 


 खासदार असतानाही गौतम गंभीर पैशासाठी आयपीएलमध्ये काम करतोय? यावर गौतम गंभीर म्हणाला की, 'पैशाची गरज प्रत्येकाला असते. मी इमानदारीने कमवतो अन् लोकांची सेवा करण्यात पैसे खर्च करतो.' गौतम गंभीर म्हणाला की, 'गरजूंना जेवण पुरवतो, त्यासाठी पैसे लागतात. त्यासाठी मी खासदार कोट्यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर करत नाही.'


 वर्षाला 2.75 कोटींचा खर्च- 
गरजूंना जेवण पुरवण्यासाठी पैसे लागतात. त्यासाठी मला काम करावेच लागले. महिन्याला पाच हजार लोकांना जेवण देण्यासाठी 25 लाख रुपयांचा खर्च येतो. वर्षाला 2.75 कोटी रुपये खर्च होतात. गरजूंच्या जेवणाला लागणारा पैसा खासदार निधीतून वापरत नाही. त्यासाठी मी कमवतोय.  आयपीएलमध्ये काम करतो अथवा समालोचन करतोय, याची मला लाज वाटत नाही, असे लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर म्हणाला.


आणखी वाचा: