IPL 2024 : ठाण्यातील एका हॉटेलमध्ये आयपीएलवर सट्टेबाजीचा काळाबाजार सुरु होता. ठाणे पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर छापेमारी करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेले तिन्ही जण छत्तीसगडमधील असल्याचं समोर आले आहे. कोंगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल के.एन. पार्क येथे पोलिसांनी धडक कारवाई करत तीन जणांना बेड्या ठोकल्या. 


ठाण्यातील कोंगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल के.एन. पार्क, कोनगाव येथे पोलिसांनी धडक कारवाई करत तीन जणांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी याबाबतची माहिती मिळाल्यानंतर धडक कारवाई केली. पोलिसांनी गुरुवारी छापेमारी करीत  शानू ललित बेरीवाल(३१), रजत बाबुला शर्मा(४०) आणि विजय सीताराम देवगन (४०) यांना बेड्या ठोकल्या. तिघांकडून १२ मोबाईल फोन, ०१ टॅब व ०१ लॅपटॉप असे एकूण ०१,९७,४००/रू चा मुद्देमाल जप्त केला. तिघांच्या विरोधात कोंगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस पथक अधिक तपास करीत आहे. 


ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या पथकांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार विविध कारवाया सुरु आहेत. दरम्यान विशेष कृती दल तसेच खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सापळा रचून तिघांना अटक केले. शानू ललित बेरीवाल(३१), रजत बाबूला शर्मा,(३०) आणि विजय सिताराम देवगन (४०) सर्वजण छत्तीसगड राज्यातील असलायची माहिती गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. 


गुरुवारी संध्याकाळी पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत अटक आरोपी आएपीएल मॅचवर सट्टा लावून जुगार खेळत असताना रंगेहात पकडले. सदर आरोपी यांनी आपसात संगनमत करून लॅपटॉप मध्ये 'सुभलाभ' नावाचे सॉफ्टवेअरद्वारे क्रिकेट मॅचवर बेटिंग स्वीकारत होते. त्यांच्याकडील मोबाईल आणि लॅपटॉपमधून सट्टा स्वीकारलेली माहिती आढळली. पोलीस पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून सट्टयाची बेटींगची माहिती भरून रियलमी पॅड, टॅब मध्ये 'ताज ७७७स्पोर्ट' एप्लिकेशनवर आरसीबी व सनरायजर्स हैद्राबाद यांच्यामधील टी-२० मॅच लाईव्ह बघून, सट्टा लावणाऱ्या इतर इसमाकडून तिघांनी ११ लाख ८६ हजार ८११ रुपयांचा सट्टा स्वीकारला असलयाचे तपासात आढळले. पोलिसांनी रेड मी कंपनीचे ९ मोबाईल मध्ये 'सुपर असिस्टंट' एप्लिकेशन मध्ये बेटींग लाईन घेवून तिच्यावर ७ लाख ३ हजाराचा सट्टा खेळण्यात आलेला होता.