Mitchell Starc, IPL 2024 : पंजाबचा कर्णधार सॅम करन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. ईडन गार्डन येथे सुरु असलेल्या सामन्यात कोलकाता आणि पंजाब संघामध्ये बदल करण्यात आले आहेत. कोलकात्यानं 24.75 कोटींच्या मिचेल स्टार्कला बेंचवर बसवलं आहे. तर पंजाबकडून जॉनी बेयरस्टो याचं कमबॅक झालं आहे.
मिचेल स्टार्क संघाबाहेर -
दुखापतीमुळे कोलकात्यानं मिचेल स्टार्क याला आराम दिला आहे. मिचेल स्टार्क याला लिलावात कोलकात्यानं 24.75 कोटी रुपये खर्च करुन घेतलं होतं. पण त्याच्याकडून लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यात आता स्टार्क दुखापतग्रस्त झालाय. मिचेल स्टार्कच्या जागी कोलकात्यानं श्रीलंकेच्या दुष्मंथ चमीरा याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले आहे. चमीरानं कोलकात्यासाठी आज पदार्पण केलेय. पंजाबचा कर्णधार शिखर धवन अद्याप दुखापतीमधून सावरलेला नाही, तो प्लेईंग 11 च्या बाहेरच आहे. तर जॉनी बेयरस्टो याचं प्लेईंग 11 मध्ये कमबॅक झालं आहे.
स्टार्कवर 24.75 कोटींची बोली -
आयपीएल 2024 आधी झालेल्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सनं मिचेल स्टार्क याच्यावर कोट्यवधी रुपये उधळले होते. मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोलकात्यानं मिचेल स्टार्क याला 24.75 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. पण स्टार्क याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. विकेट घेण्यातही त्याला अपयश आले, त्याशिवाय धावाही रोखता आल्या नाहीत.
यंदाच्या हंगामात स्टार्कची कामगिरी कशी ?
सात ते आठ वर्षानंतर स्टार्कनं आयपीएलमध्ये कमबॅक केले. पण स्टार्कला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. स्टार्कची गोलंदाजी प्रतिस्पर्धी फलंदाजांनी फोडून काढली. स्टार्कला सात सामन्यात फक्त सहा विकेट घेता आल्यात. स्टार्कनं 11.48 प्रति षटक धावा खर्च केल्या आहेत. मिचेल स्टार्कने 25 षटकं गोलंदाजी केली, त्यामध्ये 287 धावा खर्च केल्या.
दोन्ही संघाची प्लेईंग 11
कोलकाता नाईट रायडर्स -
फिल सॉल्ट, सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, डी. चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रमणदीप सिंग
पंजाब किंग्जचा संघ :
जॉनी बेयरस्टो, आर. रुसो, सॅम करन (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंह, आशुतोष शर्मा, एच ब्रार, कगिसो रबाडा, हर्षल पटेल, आर. चहर, अर्शदीप सिंग