Fact Check Ms Dhoni Stuck In Ranchi : आयपीएल 2024 मध्ये एमएस धोनी शानदार फलंदाजी करत आहे. धोनीच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत आहे. आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या एमएस धोनीच्या नावावर सोशल मीडियावर एक खोटी पोस्ट व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये धोनीच्या नावावर पैशांची मागणी केली जात आहे. ऑनलाइन फसवणुकीचा हा भाग असल्याचं अनेकांनी सांगितलेय. खोट्या पोस्ट करुन लोकांना फसवण्याचं काम ऑनलाइक स्कॅममधून केले जात आहे. आता हेच स्कॅमर्स क्रिकेट चाहत्यांना टार्गेट करत आहेत. धोनीच्या नावावर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. व्हायरल पोस्टमधील व्यक्तीनं धोनी असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करत 600 रुपये मागितले आहेत. पर्स घरी विसरलो आहे, 600 रुपयांची गरज आहे. घरी परतल्यानंतर 600 रुपये परत करतो, असेही त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एमएस धोनीनं खरच ती पोस्ट केली का? या दाव्यामध्ये नेमकं सत्य काय आहे? यामध्ये नेमकं कोणतेही सत्य नाही. धोनीनं असा कोणताही मेसेज केलेला नाही. 


धोनीनं तो मेसेज केला आहे का ? नेमकं सत्य काय ?


क्रिकेट चाहते आता स्कॅमर्सच्या निशाण्यावर आहे. फसवणूक करणाऱ्यांनी पैसे हडपण्यासाठी एमएस धोनीच्या नावाचा वापर करत आहेत. पोस्टमध्ये स्कॅमर्सनं धोनीच्या फोटोचाही वापर केलाय. रांचीमध्ये फसलो आहे. मी पर्सही घरी विसरलो आहे. मला 600 रुपयांची गरज आहे. घरी परतल्यानंतर पैसे माघारी करतो, तुम्ही मला मदत कराल का ? असा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. पण या पोस्टमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं दिसतेय. नेटकऱ्यांनी त्या पोस्टची खिल्ली उडवली आहे. वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. 
 
पाहा व्हायरल पोस्ट - 





 
सोशल मीडियावर धोनीच्या नावावर पैसे मागितल्याची पोस्ट व्हायरल झाली. कुणी पैसे ट्रान्सफर केले की नाही? याबाबत माहिती समोर आलेली नाही. पण काही जागृक नेटकऱ्यांनी या पोस्टला रिपोर्ट केले आहे. तर काहींनी क्वूआर कोड मागत खिल्ली उडवली आहे. फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा, असा सल्ला काही नेटकऱ्यांनी दिलाय. दरम्यान, डीओटी इंडियाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) खात्यावर ही पोस्ट रिशेअर केली असून महत्वाचा मेसेज दिलाय. तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातोय, आशा घोटाळेबाजापासून सावध राहा.. असे पोस्टमध्ये म्हटले आहे.