Sunil Gavaskar on Warner : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या क्रिकेट सामन्यांसह खेळाडूंबाबतच्या प्रतिक्रिया अनेकदा अगदी योग्य असल्याचं दिसून आलं आहे. आता देखील त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरबद्दल (David Warner) महत्त्वाची प्रतिक्रिया देत यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) दिल्लीकडून (Delhi Capitals) खेळताना त्याच्या फॉर्ममागील कारण दिल्लीच्या ड्रेसिंग रुममधील त्याच्याबद्दलचं सकारात्मक वातावरणचं आहे. असं म्हटलं आहे.


मागील हंगामात डेव्हिड वॉर्नरला खराब फॉर्ममुळे सनरायजर्स हैदराबाद (SRH) संघाचा कर्णधार पदानंतर संघातूनही बाहेरचा रस्ता पाहावा लागला होता. त्याच्यासोबत घडलेल्या या साऱ्या प्रकारावर क्रिकेट जगतात अनेक चर्चा झाल्या होत्या. त्यामुळे यंदा महालिलावात तो दुसऱ्या संघात जाईल हे जवळपास निश्चित होतं. ज्यानंत दिल्ली कॅपिटल्सने वॉर्नरला 6.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. ज्यानंतर त्यानेही दमदार कामगिरी करत आतापर्यंतच्या सामन्यात संघासाठी महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. त्यामुळे त्याला वागणूकही चांगली मिळत असल्याने ड्रेसिंग रुममधील हेच वातावरण त्याच्या फॉर्ममागील कारण आहे, असं गावस्कर म्हटले आहेत.  


वॉर्नर दिल्लीसाठी महत्त्वाचा खेळाडू - हेडन


ऑस्ट्रेलिया संघाचा माजी सलामीवीर आणि दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडन याने देखील डेव्हिड वॉर्नरचं कौतुक केलं आहे. डेव्हिडच्या फलंदाजीमुळेच दिल्ली कॅपिटल्स संघाच्या डावाला गती मिळत असल्याचं हेडनने म्हटलं आहे. वॉर्नरचा फिटनेस त्याला कमाल कामगिरी करण्यासाठी महत्त्वाचा ठरत असल्याचं हेडन म्हणाला. 


हे देखील वाचा-