India Squad Depart For USA नवी दिल्ली: आयपीएल संपल्यानंतर काही दिवसात सुरु होणारा टी-20 वर्ल्ड कप क्रिकेटच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणर आहे.आयपीएल अंतिम टप्प्यात असताना टीम इंडिया  वर्ल्ड कप मोहिमेवर कधी जाणार याबाबत अपडेट समोर आली आहे. टीम इंडिया 25 मे रोजी टी-20 वर्ल्ड कपच्या मोहिमेवर जाणार आहे.  आयपीएलच्या अंतिम फेरीची लढत 26 मे रोजी होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ही लढत होईल. त्यापूर्वीच भारतीय संघातील खेळाडू अमेरिकेला रवाना होणार आहेत. तर, जे खेळाडू आयपीएलमध्ये शेवटच्या मॅचमध्ये व्यस्त असतील त्यांना 26 मेची फायनल पार पडल्यानंतर अमेरिकेला जावं लागणार आहे.  


भारताची टीम दोन टप्प्यात अमेरिकेला जाणार ? 


भारतीय क्रिकेट टीम दोन टप्प्यात अमेरिकेला जाणार आहे. जे खेळाडू आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीतील संघांमध्ये नसतील ते 25 मे रोजी अमेरिकेला जातील. तर, उर्वरित खेळाडू आयपीएलची फायनल संपल्यानंतर तातडीनं अमेरिकेला जाणार हेत.  


बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार "रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल आणि टीमचा सपोर्ट स्टाफ 25 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहेत.  


भारताची पहिली लढत 5 जूनला


भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 1 जूनला सराव सामना होणार आहे. तर, 5 जूनला भारत आणि आयरलँड यांच्यात पहिली लढत न्यूयॉर्कमध्ये होईल. ही मॅच बने नासाउ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर मॅच होईल. त्यानंतर भारत आणि पकिस्तान मॅच 9 जून रोजी होणार आहे. तर,12 जूनला अमेरिका आणि 16 जूनला कॅनडा विरुद्द भारताची मॅच होणार आहे.  


भारताची टीम टीम: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज


राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान 


दरम्यान, भारतानं 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघ आयसीसीच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवू शकलेला नाही. भारतानं 2023 च्या वनडे वर्ल्ड कप, 2015 आणि 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये धडक दिली होती. 2021 आणि 2023 मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघानं धडक दिलेली. 2014 च्या टी 20 वर्ल्ड कप आणि त्यानंतर 2016 आणि 2022 मध्ये सेमीफायनलपर्यंत भारताच्या संघानं मजल मारली होती. मात्र, टीम इंडियाला गेल्या 11  वर्षात आयसीसी ट्रॉफीचं विजेतेपद मिळालेलं नाही.  


संबंधित बातम्या :


चेन्नईच्या पराभवानंतर ऑनकॅमेरा ढसाढसा रडला, आता आरसीबीच्या जखमेवर मीठ चोळलं,माजी खेळाडूच्या वक्तव्यानं खळबळ, म्हणाला...


RCB कडून गार्ड ऑफ ऑनर, विराटची मिठी; डीके दादाच्या निवृत्तीनंतर अख्खं मैदान भावूक, पाहा व्हिडीओ!