Suryakumar Yadav Fitness Update : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अद्याप 100 टक्के तंदुरुस्त नसल्याचं समोर आले आहे. सूर्यकुमार यादव पूर्णपणे फिट नसतानाही आयपीएलमध्ये (IPL 2024) खेळत आहे. सूर्यकुमार यादवनं पंजाबविरोधात (MI vs PBKS) वादळी अर्धशतक ठोकलं पण तो अद्याप तंदुरुस्त नाही. सूर्यकुमार विश्वचषकापर्यंत (T20 World Cup 2024) 100 टक्के फिट होईल, असं सांगण्यात येतेय. पण तंदुरुस्त नसाताना सूर्यकुमार यादव याला आयपीएलमध्ये खेळवणं कितपत योग्य आहे, असाही सवाल उपस्थित होत आहे. सूर्यकुमार यादव आतापर्यंत फक्त इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरत आहे. 


रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव अद्याप 100 टक्के फिट नाही. शस्त्रक्रियेनंतर त्यानं एनसीएमध्ये फिटनेसवर काम केले. त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची मूभाही मिळाली. पण तो अद्याप 100 टक्के फिट नसल्याचं समोर आले आहे. विश्वचषकापर्यंत सूर्यकुमार तंदुरुस्त होईल, असे सांगण्यात येत आहे. सूर्यकुमार तंदुरुस्त झाल्यास टीम इंडियाला फायदाच होणार आहे. पण आयपीएलमध्ये तो आणखी दुखापतग्रस्त झाला, तर टीम इंडियाला हा मोठा धक्का मानला जातोय. 


पंजाब किंग्सविरोधात सूर्यकुमार यादवच चमकला - 


गुरुवारी मुंबईने पंजाबचा 9 धावांनी पराभव केला. मुंबईच्या विजयामध्ये सूर्यकुमार यादव याची मोठी भूमिका राहिली. पंजाब किंग्सविरोधात सूर्यकुमार यादव यानं शानदार खेळी केली. सूर्यानं 53 चेंडूमध्ये 78 धावांचा पाऊस पाडला. या शानदार खेळीमध्ये सूर्यकुमार यादव यानं सात चौकार आणि तीन षटकार लगावले. यंदाच्या आयपीएलमध्ये सूर्याची कामगिरी तशी सरासरीच राहिली आहे. त्याला अद्याप हवा तसा सूर मिळाला नाही. कदाचीत फिटनेसमुळे सूर्या पूर्णपणे फॉर्मात परतला नसेल, असाही अंदाज वर्तवला जातोय. 


यंदाच्या हंगामात सूर्याची कामगिरी - 


आयपीएलच्या 17 व्या हंगामात सूर्यकुमार यादव सरासरी फॉर्मात आहे. त्यानं पंजाब आणि आरसीबीविरोधात शतक ठोकलं. दिल्लीविरोधात सूर्याला खातेही उघडता आले नव्हते. आरसीबीविरोधात सूर्यानं 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं. या खेळीमध्ये चार षटकार आणि पाच चौकार ठोकले. चेन्नईविरोधात सूर्याला खातेही उघडता आले नाही. सूर्यानं चार डावामध्ये दोन अर्धशतक ठोकली आहेत, पण दोन डावात त्याला खातेही उघडता आले नाही. टी 20 विश्वचषकात सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा हुकमी एक्का असेल. त्यामुळे सूर्यकुमार यादव याची फिटनेस महत्वाची आहे.


आणखी वाचा :


VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला