Suryakumar Yadav Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची आयपीएल 2024 च्या हंगामात चांगली सुरुवात झाली नाही. मुंबईचा सलग 3 सामन्यात पराभव झालेला आहे. या हंगामातील पहिल्या विजयाची वाट पाहत आहे.
मुंबईचा आगामी सामना 7 एप्रिलला ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. याचदरम्यान मुंबईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. स्फोटक फलंदाज मुंबईच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी आज रवाना झाला आहे. नुकतेच सूर्यकुमार यादवला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून मंजुरी मिळाली होती. सूर्यकुमार यादवने तंदुरुस्तीच्या चाचणीत जवळपास सर्व निकष पूर्ण केले आहेत.
सूर्या बनला 'अक्षय कुमार यादव'...
मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव अक्षय कुमारच्या रुपात दाखवण्यात आला आहे. त्याचवेळी, चाहते व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादवला 'अक्षय कुमार यादव' म्हणताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- समजले का? नाही, तुम्हाला समजले नाही... असो, मुंबई इंडियन्सची पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सातत्याने कमेंट करून आपले मत व्यक्त करत आहेत.
दिल्लीविरुद्ध सूर्या मैदानात उतरणार-
सूर्यकुमार यादव दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात परतणार आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 7 मार्च रोजी वानखेडे मैदानावर होणार आहे. पॉइंट टेबलमध्ये सध्या मुंबई इंडियन्स तळाशी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स नवव्या स्थानावर आहे. आत्तापर्यंत मुंबई इंडियन्सचा सलग तीन सामन्यांत पराभव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सला 3 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले, परंतु चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले.
हार्दिक पांड्याला दिलासा
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याचं देखील सूर्यकुमार यादवच्या कमबॅकमुळं टेन्शन मिटणार आहे. सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडून चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर बॅटिंग करतो. तो संघात नसल्यानं हार्दिक पांड्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावं लागत होतं. ती समस्या आता दूर होऊ शकते. मुंबईला गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. सूर्यकुमार यादव संघात परतल्यानं हार्दिक पांड्याला दिलासा मिळणार आहे.
संबंधित बातम्या:
11 चेंडूत अर्धशतक, युवराज सिंगचा 16 वर्षांचा मोडलाय विक्रम; कोण आहे आशुतोष शर्मा?