GT vs PBKS Ashutosh Sharma: आशुतोष शर्माने (Ashutosh Sharma) पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. IPL 2024 च्या 17 व्या सामन्यात गुजरात विरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आशुतोषने 17 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 31 धावांची शानदार खेळी केली. पंजाबला अशा खेळीची सर्वाधिक गरज असताना आशुतोषने आक्रमक फलंदाजी केली. 


कोण आहेत आशुतोष शर्मा?


आशुतोष शर्मा यांचा जन्म 15 सप्टेंबर 1998 रोजी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला होता. तो रेल्वेकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. पण पूर्वी तो फक्त मध्य प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असे. मीडिया रिपोर्ट्सवर 2020 मध्ये मध्य प्रदेश संघ सोडावा लागला होता. चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशचे प्रशिक्षक झाल्यावर आशुतोषला राज्य संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, त्यानंतर तो रेल्वे संघात सामील झाला. भारताकडून खेळलेल्या नमन ओझाने आशुतोषला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत केल्याचे बोलले जाते. आशुतोष लहानपणी नमनचा चाहता होता. नमन ओझा हा देखील मध्य प्रदेशचा आहे.


11 चेंडूत झळकावलेय अर्धशतक-


गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला होता. स्पर्धेतील क गटातील सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा 16 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. युवराज सिंगने 2007 च्या T20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.


पाहा आयपीएलचे Latest Points Table-


तिन्ही सामने जिंकणारा कोलकाता नाईट रायडर्स + 2.518 च्या उत्कृष्ट नेट रनरेटच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थाननेही आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. राजस्थानचा नेट + 1.249१ आहे. यानंतर 3 पैकी 2 जिंकणारा चेन्नई सुपरजायंट्स तिसऱ्या आणि लखनौ सुपर जायंट्स चौथ्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा नेट रन रेट +0.976 आणि लखनौचा +0.483 आहे. त्यानंतर पंजाब किंग्ज 4 गुणांसह पाचव्या तर गुजरात टायटन्स सहाव्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद 2 गुणांसह सातव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आठव्या आणि दिल्ली कॅपिटल्स नवव्या स्थानावर आहे. हैदराबादने 3 सामने खेळले आहेत, त्यापैकी 1 पराभव झाला आहे. बंगळुरू आणि दिल्ली 4-4 सामने खेळले आहेत. ज्यात त्यांना फक्त 1-1 जिंकता आले आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत विजयाचे खाते उघडता आलेले नाही आणि ते टेबलमध्ये तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहेत.


संबंधित बातम्या:


गुजरातविरुद्ध स्फोटक खेळी, सामनावीर पुरस्कारही मिळवला; पण शशांक सिंग हे काय बोलून गेला?


पंजाबने गुजरातच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; शेवटच्या षटकांत थरार, नेमकं काय घडलं?


हार्दिक पांड्यावर चाहत्यांचा रोष का वाढला?; रवी शास्त्रींनी सांगितले यामगील एकमेव कारण!