Travis Head Abhishek Sharma : कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या सतराव्या मोसमाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या इतिहासात कोलकात्याचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादचा अख्खा डाव 113 धावांत गुंडाळून आपल्या संघाला विजयाची नामी संधी मिळवून दिली. कोलकात्याच्या फलंदाजांनी विजयासाठीचं लक्ष्य अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात आणि तब्बल 57 चेंडू राखून पार केलं. हैदराबादकडून अख्ख्या आयपीएल हंगामात वादळी सुरुवात केली, पण ऐन मोक्याला दोघाही स्पशेल फेल ठरले. त्यामुळेच हैदराबादची धावसंख्या मर्यादीत राहिली. हैदराबादचा फायनलमध्ये दारुण पराभव झाला. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर हैदराबादची बरीच मदार होती, पण त्यांनाच कोलकात्याने रोखलं. 


हेड -अभिषेकचे यंदाच्या हंगामातील सर्वात विस्फोटक जोडी


ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा हे पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी करतात. या दोघांसमोर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरते. दोघांनी यंदाच्या हंगामात वादळी फलंदी केली. त्यांनी सलामीला 689 धावा जोडल्या आहेत.   या दोघांचा स्ट्राईक रेट 227 इतका राहिलाय. लखनौविरोधात या दोघांनी 10 षटकांमध्ये 165 धावांच्या यशस्वी पाठलाग केला होता. याच आक्रमक जोडीला कोलकात्यासमोर अपयश आले. क्वालिफायर 1 आणि फायनलमध्ये या दोघांना कोलकात्याने रोखलं, अन् चषखावर नाव कोरले. 



हेड आणि अभिषेक शर्मा यांनी खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. पण फायनलमध्ये दोन्ही फलंदाज फेल ठरले. हेड याला खातेही उघडता आले नाही, तर अभिषेक शर्मा फक्त दोन धावा काढून बाद झाला. 
 
ट्रेविस हेड 


हैदराबादचा सलामी फलंदाज ट्रेविसहेडसमोर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरते.  हेड याने सगळ्या आयपीएलमध्ये आक्रमक फलंदाजी केली. पण फायनलला फेल ठरला. हेड याने 15 डावात 44 च्या सरासरीने 192 च्या स्ट्राईक रेटने 567 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके ठोकली आहेत. पण मोक्याच्या क्षणी हेड पचकला, मागील चार सामन्यात त्याला एकही अर्धशतक ठोकता आले नाही. फायनलमध्ये त्याला खातेही उघडता आले नाही. 


अभिषेक शर्मा


हेड आणि अभिषेक शर्मा याने सगल्या आयपीएलमध्ये हैदराबादला आक्रमक सुरुवात दिली. अभिषेक शर्मा याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. अभिषेक शर्मा याने 16 सामन्यात 32.27 च्या सरासरीने 484 धावा चोपल्या आहेत. अभिषेक शर्माच्या बॅटमधून तीन अर्धशतके निघाली आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार अभिषेक शर्माच्या नावावर आहेत, त्याने 42 षटकार ठोकले आहेत. अभिषेक शर्माने यंदाच्या हंगामात दोन अर्धशतके ठोकली आहेत.