KKR vs SRH, IPL Final 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण कोलकात्याच्या भेदक माऱ्यासमोर अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी नांगी टाकली. पहिल्या दोन षटकांमध्ये हैदराबादचे सलामी फलंदाज तंबूत परतले. मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माच्या दांड्या उडवल्या, दुसऱ्या षटकात वैभव अरोरा यानं हेडचा अडथळा दूर केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. 


स्टार्कचा अप्रतिम चेंडू - 


मिचेल स्टार्क याच्या भीतीमुळे ट्रेविस हेड यानं अभिषेक शर्माला स्ट्राईकवर पाठवले. पण स्टार्कच्या स्विंग अन् वेगवान चेंडूपुढे अभिषेक शर्माही फेल ठरला. स्टार्कने टाकलेला चेंडू अभिषेक शर्मा याला समजलाच नाही. स्टार्कने अभिषेक शर्माच्या दांड्या उडवल्या. स्टार्कने फायनलमध्ये अप्रतिम चेंडूवर कोलकात्याला पहिलं यश मिळवून दिलं. पाहा व्हिडीओ...







हेडला भोपळाही फोडता आला नाही, स्पशेल फ्लॉप - 


ट्रेविस हेड पुन्हा एकदा फेल ठरला. मागील चार सामन्यात हेड याला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. वैभव अरोराच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात हेडने विकेट फेकली. वैभव अरोराने ट्रेविस हेड याला शून्यावर तंबूत धाडले. 


 










हेड -अभिषेकचे वादळ, स्ट्राईक रेट 227 -


ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा हे पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी करताता. या दोघांसमोर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरते. दोघांनी आतापर्यंत 689 धावा जोडल्या आहेत. या दोघांचा स्ट्राईक रेट 227 इतका राहिलाय. लखनौविरोधात या दोघांनी 10 षटकांमध्ये 165 धावांच्या यशस्वी पाठलाग केला होता. हेड आणि अभिषेक शर्मा यांना रोखणं कोलकात्यासमोर मोठं आव्हान असेल.  


हेड आणि अभिषेक शर्मा यांनी खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. फायनलआधी त्यांचे आकडे काय सांगतात... 


ट्रेविस हेड 


हैदराबादचा सलामी फलंदाज ट्रेविस हेड याने आतापर्यंत आक्रमक फलंदाजी केली आहे. हेडसमोर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरते. हेड याने आतापर्यंत 44 च्या सरासरीने 192 च्या स्ट्राईक रेटने 567 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके ठोकली आहेत. 


अभिषेक शर्मा


हेड आणि अभिषेक शर्मा याने हैदराबादला आक्रमक सुरुवात दिली. अभिषेक शर्मा याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. अभिषेक शर्मा याने 34.43 च्या सरासरीने 482 धावा चोपल्या आहेत. अभिषेक शर्माच्या बॅटमधून तीन अर्धशतके निघाली आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार अभिषेक शर्माच्या नावावर आहेत, त्याने 42 षटकार ठोकले आहेत.