हैदराबाद :आयपीएलमध्ये (IPL 2024) सनरायजर्स हैदराबादनं (Sun Risers Hyderabad) ट्रेविस हेड (Travis Head) आणि अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) वादळी खेळीच्या जोरावर लखनौवर ऐतिहासिक विजय मिळवला. लखनौ सुपर जाएंटसनं पहिल्यांदा फलंदाजी करताना  4  विकेटवर 165 धावा केल्या होत्या. हैदराबादच्या सलामीच्या जोडीनं यापूर्वी देखील वादळी सुरुवात करुन दिली होती. त्याप्रमाण काल देखील ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं वादळी खेळी केली. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं अवघ्या 58 बॉलमध्येच संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माचा व्हिडीओ सनरायजर्स हैदराबादनं पोस्ट केला आहे. ट्रेविस हेडनं देखील अभिषेक शर्मासोबत फलंदाजी करताना काय वाटतं त्याबद्दल भावना व्यक्त केल्यात. 


हैदराबादनं शेअर केलेल्या व्हिडीओत काय?


सनरायजर्स हैदराबादनं शेअर केलेल्या व्हिडीओत ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा त्यांच्या नव्या जर्सीबद्दल बोलत आहेत. त्यामध्ये ट्रेविस हेड शॉर्ट जर्सीपेक्षा नवी जर्सी चांगली असून आवडत असल्याचं म्हणतोय. नव्या जर्सीमध्ये आम्ही चांगली कामगिरी करतोय, असं देखील ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं म्हटलं आहे. आम्ही पुन्हा लीग स्टेजमधील शेवटच्या मॅचमध्ये येत आहोत, असं ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं म्हटलं. 


पाहा व्हिडीओ : (Travis Head Abhishek Sharma Video)






ट्रेविस हेडनं अभिषेक शर्मा हा भारतीय क्रिकेटसाठी गुणवंत क्रिकेटर ठरेल, असं म्हटलं. ट्रेविस हेडनं पुढं म्हटलं की अभिषेक शर्मासोबत फलंदाजी करायला आवडतं. तो धावा करत असताना पाहणं हा चांगला अनुभव असतो. अभिषेक शर्मा कठोर मेहनत घेत असून तो ज्या प्रकारे प्रत्येक बॉल खेळतो ते देखील आश्चर्यकारक असतं, असं ट्रेविस हेड म्हणाला. 


 ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या फलंदाजीचं वादळ


लखनौ सुपर जाएंटसनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 विकेटवर 165 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरपासून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं आक्रमक भूमिका घेत फटकेबाजी केली. अवघ्या 58 बॉलमध्ये  सनरायजर्स हैदराबादनं विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.   


अभिषेक शर्मानं 28 बॉलमध्ये 75 धावा केल्या. यामध्ये त्यानं सहा षटकार आणि आठ चौकार मारले. तर,  ट्रेविस हेडनं 30 बॉलमध्ये 89 धावा केल्या. हेडनं 8 षटकार आणि 8 चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. 


दरम्यान, सनरायजर्स हैदराबादसाठी ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांची सलामीची जोडी फायदेशीर ठरली आहे. 


संबंधित बातम्या :


KL Rahul : संघमालकानं ऑन कॅमेरा सुनावलं, तू तात्काळ लखनौची टीम सोड, केएल राहुलकडे कुणी केली मागणी,काय घडलं? पाहा व्हिडीओ


LSG Playoffs Scenario : लखनौसाठी अजूनही सगळं संपलेलं नाही, प्लेऑफमध्ये एंट्रीचा मार्ग अद्याप कायम, जाणून घ्या समीकरण