हैदराबाद : आयपीएलमधील (IPL) प्लेऑफच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं (Sun Risers Hyderabad) लखनौ सुपर जाएंटसला पराभूत केलं. लखनौ सुपर जाएंटसचा (Lucknow Super Giants) या पराभवामुळं प्लेऑफमधील मार्ग खडतर झालेला असला तरी बंद झालेला नाही. लखनौ सुपर जाएंटसचे अजून दोन सामने बाकी असून प्लेऑफचा मार्ग त्यांच्यासाठी खुला आहे. लखनौ सुपर जाएंटसनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. लखनौनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 165  धावा केल्या होत्या. सनरायजर्स हैदराबादनं हे आव्हान दहाव्या ओव्हरमध्येच पार केलं. सनरायजर्स हैदराबादनं 10 विकेट राखून आणि 62 बॉल शिल्लक असतानाच विजय मिळवल्यानं त्यांनी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे लखनौ सुपर जाएंटस सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचलं आहे. 


लखनौसाठी प्लेऑफची संधी कायम


सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जाएंटस दोन्ही संघांनी यंदाच्या आयपीएलमध्ये 12 मॅच खेळलेल्या आहेत. यामध्ये हैदराबादनं 7 मॅचमध्ये विजय मिळवला तर 5 मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे लखनौ सुपर जाएंटस 6 विजय आणि 6 पराभवांसह 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यांचं नेट रनरेट -0.76 इतकं आहे. 


मुंबई इंडियन्स गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. मुंबईच्या नावावार 12 मॅचमध्ये 8 पराभव आणि चार विजयांसह 8 गुण आहेत. हैदराबादनं मोठ्या फरकानं लखनौला पराभूत केल्यानं मुंबई प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. 


लखनौ सुपर जाएंटसला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहायचं असल्यास राहिलेल्या दोन मॅचमध्ये मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल. यामुळं त्यांचे 16 गुण होतील आणि नेट रनरेटमध्ये देखील चांगला असणं आवश्यक आहे. लखनौचे दोन सामने दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्याविरुद्ध होणर आहेत. मात्र, लखनौसाठी हे पुरेसं नसणार आहे. 


कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सच्या नावावर 16 गुण आहेत. दोन्ही संघांचे अजून प्रत्येकी तीन सामने बाकी आहेत. हैदरबाद आणि चेन्नई देखील 18 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. दिल्ली कॅपिटल्सला देखील 16 गुणांपर्यंत पोहोतण्याची संधी आहे. 


लखनौ सुपर जाएंटसला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असल्यास हैदराबाद, चेन्नई आणि दिल्ली दोन संघांना 16 गुणांपर्यंत पोहोचण्यामध्ये अपयश येणं आवश्यक आहे. यानंतर लखनौ 16 गुणांसह चौथ्या स्थानासह प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकते.  लखनौला त्यांचं नेट रनरेट देखील चांगलं ठेवणं आवश्यक आहे. 


लखनौ सुपर जाएंटसला प्लेऑफमध्ये  कसा प्रवेश मिळू शकतो? 


गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज : गुजरात टायटन्स विजय 
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स : राजस्थान रॉयल्स विजय 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स : आरसीबी विजय
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध  लखनौ सुपर जाएंटस : लखनौ विजय 
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंटस : लखनौ विजय 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध  चेन्नई सुपर किंग्ज : आरसीबी विजय 


संबंधित बातम्या : 


LSG : पराभवानं आम्ही दुखावलोय, नव्यानं सुरुवात करु, लखनौचं भावनिक ट्विट, हैदराबादसाठी खास पोस्ट 


KL Rahul : संघमालकानं ऑन कॅमेरा सुनावलं, तू तात्काळ लखनौची टीम सोड, केएल राहुलकडे कुणी केली मागणी,काय घडलं? पाहा व्हिडीओ