SRH vs RCB, IPL 2023 Live : हैदराबाद-आरसीबी यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

SRH vs RCB Live Score: प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आरसीबीसाठी आजचा सामना महत्वाचा आहे.. हैदराबाद शेवट विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 18 May 2023 11:00 PM
आरसीबीचा हैदराबादवर आठ विकेटने विजय

आरसीबीचा हैदराबादवर आठ विकेटने विजय

फाफ ड्यु प्लेसिस 71 धावांवर बाद

फाफ ड्यु प्लेसिस 71 धावांवर बाद, नटराजनने घेतली विकेट, 47 चेंडूत 71 धावांची केली खेळी

Virat Kohli : विराट कोहलीचे शतक

विराट कोहलीने 62 चेंडूत शतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचं हे पहिलंच शतक आहे. शतक झळकावल्यानंतर तो बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याची विकेट घेतली.

आरसीबीच्या 100 धावा पूर्ण

विराट-फाफची आक्रमक फलंदाजी, आरसीबीच्या 100 धावा पूर्ण

विराट कोहलीचे झंझावाती अर्धशतक

षटकार लगावत विराट कोहलीचे झंझावाती अर्धशतक

फाफ डु प्लेसिसचे वादळी अर्धशतक

फाफ डु प्लेसिसचे वादळी अर्धशतक.... 34 चेंडूत झळकावले अर्धशतक.. फाफचे यंदाचे हे आठवे अर्धशतक होय

विराट-फाफचा झंझावात

विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी झंझावाती फलंदाजी सुरु केली. 8.2 षटकात बिनबाद 87 धावा

विराट कोहली- डुप्लेसिसची वादळी सुरुवात

विराट कोहली- डुप्लेसिसची वादळी सुरुवात...  हैदराबादच्या गोलंदाजांचा घेतला समाचार

क्लासेनचे वादळी शतक

हेनरिक क्लासेन याने पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी केली. क्लासेन याने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. क्लासेन याने 51 चेंडूत 104 धावांची खेळी केली. या खेळीत क्लासेन याने  आठ चौकार आणि सहा षटकार लगावले. क्लासेन याने आरसीबीच्या फिरकी गोलंदाजांची समाचार घेतला. क्लासेनपुढे आरसीबीची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. क्लासेन याने मार्करम याच्यासोबत 50 चेंडूत 76 धावांची भागिदारी केली. यामद्ये क्लासेनचे योगनाद 58 धावांचे होते.तर क्लासेन आणि ह२री ब्रूक यांनी 36 चेंडूत 74 धावांची भागिदारी केली. यामध्ये क्लासेन याचे योगदान 46 धावांचे होते. क्लासनेच्या वादळी फलंदाजीच्या बळावर हैदराबादचा संघ सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचलाय. 




 


आरसीबीला विजयासाठी 187 धावांचे आव्हान

IPL 2023, SRH vs RCB: हेनरिक क्लासेनच्या वादळी शतकाच्या जोरावर हैदराबादने 186 धावांपर्यंत मजल मारली. क्लासेनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. क्लासेनच्या खेळीच्या बळावर हैदराबादने पाच विकेटच्या मोबदल्यात 186 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून मायकल ब्रेसवेल यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने दोन विकेट घेतल्या. आरसीबीला विजयासाठी 187 धावांचे आव्हान आहे. 

हैदराबादची 186 धावांपर्यंत मजल

हैदराबादची 186 धावांपर्यंत मजल

ग्लेन फिलिप्स बाद

मोहम्मद सिराजच्या चेंडूवर ग्लेन फिलिप्स बाद

क्लासेन बाद

शतकानंतर हेनरिक क्लासेन बाद झालाय.

क्लासेनच्या आधी कुणी शतक झळकावलेय..

हॅरी ब्रूक, वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल यांनी यंदाच्या हंगामात शतक झळकावलेय.

हेनरिक क्लासेनचे वादळी शतक

हेनरिक क्लासेन याने वादळी शतक झळकावले. क्लासेन याने 49 चेंडूत शतक झळकावले. 

क्लासेनचा झंझावात

हेनरिक क्लासेन याने झंझावती फलंदाजी केली. क्लासेन याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतोय. क्लासेनने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतलाय.

हैदराबादला तिसरा धक्का

एडन मार्करम बाद झालाय.. शाहबाजने मार्करमला त्रिफाळाचीत केलेय... माक्ररम 18 धावांवर बाद झाला

क्लासेनचे वादळी अर्धशतक

हेनरिक क्लासेन याने वादळी अर्धशतक झळकावलेय... 24 चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली.

क्लासेन-मार्करने डाव सावरला

दोन विकेट झटपट पडल्यानंतर क्लासेन आणि मार्करम यांनी हैदराबादचा डाव सावरला. विशेषकरुन क्लासेन याने वादळी फलंदाजी सुरु केली आहे.  क्लासेन 17 चेंडूत 37 धावांवर खेळत आहे. हैदराबाद दोन बाद 73 धावा

हैदराबादला दुसरा धक्का

ब्रेसवेल याने एकाच षटकात हैदराबादला दिला दुसरा धक्का.. राहुल त्रिपाठी 15 धावांवर बाद झालाय.

अभिषेक शर्मा बाद

अभिषेक शर्मा बाद झालाय... मायकल ब्रेसवेल याने शर्माला पाठवले तंबूत... शर्मा याने 14 चेंडूत 11 धावांची खेळी केली.

अभिषेक शर्मा-राहुल त्रिपाठीची दमदार सुरुवात

अभिषेक शर्मा-राहुल त्रिपाठीची दमदार सुरुवात.. आरसीबीच्या गोलंदाजांची केली धुलाई

SRH vs RCB Live Score: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची प्लेईंग 11

विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (विकेटकीपर), शाहबाज अहमद, मायकल ब्रेसवेल, वेन पार्नेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज

प्लेऑफच्या दृष्टीनं आरसीबीसाठी हा सामना महत्त्वाचा 

 


विशेष म्हणजे, RCB चा संघ 12 सामन्यांत 6 विजय आणि 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. हा सामना जिंकून बंगळुरूला प्लेऑफच्या आणखी जवळ जायचं आहे. RCB पुढचे दोन्ही सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते. 

आकडे काय सांगतात?

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 69 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 30 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं मैदानात धडक मारली आहे. त्याचबरोबर 39 सामन्यांमध्ये विजयाचा पाठलाग करणाऱ्या संघाच्या हातात आहे. हैदराबादच्या घरच्या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 159 आहे.

हैदराबादच्या खेळपट्टीचा अहवाल?

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत करते. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंची मोठी भूमिका असते. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ यांच्यात झालेल्या शेवटच्या सामन्यात या मैदानावर 367 धावा झाल्या होत्या आणि फक्त 9 विकेट्स पडल्या होत्या.

हैदराबाद जिंकल्यास आरसीबी पेचात 

हैदराबाद आयपीएल 2023 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे हैदराबादचं प्लेऑफचं स्वप्न यापूर्वीच भंगलं आहे. अशा परिस्थितीत अॅडम मार्करामच्या नेतृत्वाखाली एसआरएच अंतिम चारमध्ये खेळण्याचं आरसीबीचं स्वप्न भंग करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. या सीझनमध्ये SRH च्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार वगळता बाकीचे गोलंदाजही अडचणीत आले आहेत. 

बंगळुरू -हैदराबाद हेड टू हेड

 


आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आतापर्यंत 21 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये हैदराबादनं 12 तर बंगळुरूनं 9 सामने जिंकले आहेत. एकंदरीत, हैदराबादचा आरसीबीवर वरचष्मा आहे. आज या दोन्ही संघांमध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे.

हैदराबादची प्रथम फलंदाजी

हैदराबादची प्रथम फलंदाजी

आरसीबीने नाणेफेक जिंकली

फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

पार्श्वभूमी

IPL 2023, Match 65, SRH vs RCB : सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबाद येथे खेळवला जाईल. हा सामना जिंकून आरसीबीला प्लेऑफच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकायचं आहे. तर हैदराबाद शेवट विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.


बंगळुरू -हैदराबाद हेड टू हेड


आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आतापर्यंत 21 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये हैदराबादनं 12 तर बंगळुरूनं 9 सामने जिंकले आहेत. एकंदरीत, हैदराबादचा आरसीबीवर वरचष्मा आहे. आज या दोन्ही संघांमध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे.


हैदराबाद जिंकल्यास आरसीबी पेचात 


हैदराबाद आयपीएल 2023 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेला आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यामुळे हैदराबादचं प्लेऑफचं स्वप्न यापूर्वीच भंगलं आहे. अशा परिस्थितीत अॅडम मार्करामच्या नेतृत्वाखाली एसआरएच अंतिम चारमध्ये खेळण्याचं आरसीबीचं स्वप्न भंग करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. या सीझनमध्ये SRH च्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार वगळता बाकीचे गोलंदाजही अडचणीत आले आहेत. 


हैदराबादच्या खेळपट्टीचा अहवाल?


राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत करते. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंची मोठी भूमिका असते. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ यांच्यात झालेल्या शेवटच्या सामन्यात या मैदानावर 367 धावा झाल्या होत्या आणि फक्त 9 विकेट्स पडल्या होत्या.


आकडे काय सांगतात?


राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 69 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 30 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं मैदानात धडक मारली आहे. त्याचबरोबर 39 सामन्यांमध्ये विजयाचा पाठलाग करणाऱ्या संघाच्या हातात आहे. हैदराबादच्या घरच्या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 159 आहे. 


प्लेऑफच्या दृष्टीनं आरसीबीसाठी हा सामना महत्त्वाचा 


विशेष म्हणजे, RCB चा संघ 12 सामन्यांत 6 विजय आणि 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. हा सामना जिंकून बंगळुरूला प्लेऑफच्या आणखी जवळ जायचं आहे. RCB पुढचे दोन्ही सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते. 


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.