Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) 19 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) हे दोन संघ मैदानात एकमेकांसमोर येणार आहेत. आयपीएल 16 व्या (IPL 2023) हंगामातील ही लढत कोलकाताच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डन स्टेडिअमवर (Eden Gardens Stadium) पार पडणार आहे. नितीश राणाच्या नेतृत्वात कोलकाता आणि एडन मार्करमच्या नेतृत्त्वात हैदराबाद यांच्यात आज रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.


IPL 2023 : हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात लढत


कोलकाता नाईट रायडर्स संघाची आयपीएल 2023 मधील कामगिरी चांगली आहे. यंदाच्या मोसमात कोलकाताची सुरुवात पराभवासह झाली. आयपीएल 2023 मधील पहिल्या सामन्यात केकेआरला पंजाबकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कोलकाताने दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि तिसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. तर, हैदराबाद संघाला पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरच्या तिसऱ्या सामन्यात हैदराबादने पंजाब संघावर मात करत यंदाच्या मोसमातील पहिला विजय मिळवत खातं उघडलं.


Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?


आज आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.


KKR vs SRH IPL 2023 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11


IPL 2023, KKR Playing 11 : कोलकाता संभाव्य प्लेईंग 11


रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीशन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती


IPL 2023, SRH Playing 11 : हैदराबाद संभाव्य प्लेईंग 11


मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


KKR vs SRH Match Preview : कोलकाता विरुद्ध हैदराबाद लढत, कुणाचा पारड जड? पाहा हेड टू हेड आकडेवारी