RCB in green jersey : फाफ डु प्लेलिसच्या नेतृत्तवातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरुवात विजयाने केली होती. पण त्यानंतर त्यांना दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यात मुंबईला मात दिल्यानंतर आरसीबीला कोलकाता आणि लखनौकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाही आरसीबी ग्रीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. संजूच्या राजस्थानविरोधात आरसीबी 23 एप्रिल रोजी ग्रीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. सोशल मीडियावर आरसीबीच्या ग्रीन जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या ग्रीन जर्सीमध्ये विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक दिसत आहेत.
आरसीबीची ग्रीन जर्सी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरसीबीच्या चाहत्यांना ही जर्सी खूप आवडलेली आहे. सोशल मीडियावर याबाबत कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव पडत आहे. आरसीबी 23 एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर ग्रीन जर्सी परिधान करुन मैदानात उतरणार आहे. दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होत आहे. आयपीएलच्या मैदानात दरवर्षी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बंगलोरच्या संघातील खेळाडू एका सामन्यात ही हिरवी जर्सी परिधान करतात. यंदाही बंगलोरनं ही परंपरा कायम राखणार आहे. पण ग्रीन जर्सीमध्ये त्यांना पराभवाचाच सामना जास्त करावा लागत आहे. ग्रीन जर्सी आरसीबीसीठी अनलकी असल्याचे दिसत आहे.
हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये आरसीबीची कामगिरी -
आयपीएल 2011- विजय
आयपीएल 2012- पराभव
आयपीएल 2013- पराभव
आयपीएल 2014- पराभव
आयपीएल 2015 -निकाल नाही
आयपीएल 2016- विजय
आयपीएल 2017- पराभव
आयपीएल 2018- पराभव
आयपीएल 2019- पराभव
आयपीएल 2020- पराभव
आयपीएल 2021- निळ्या रंगाची जर्सी (पराभव)
काय आहे कारण?
आरसीबीने गो ग्रीनचा संदेश देण्यासाठी हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. गो ग्रीन मोहिमेंतर्गत ही सुरुवात करण्याता आली होती. प्रत्येकवर्षी एका सामन्यासाठी आरसीबी ही जर्सी घालून मैदानात उतरत असते. आयपीएलच्या चौथ्या हंगामात आरसीबीचा कोच्ची टस्कर्सविरुद्ध पहिल्यांदा हिरव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरला होता. 2021 मध्ये आरसीबीच्या या परंपरेला खंड पडला होता. कारण, कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आरसीबीचा संघ निळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरला होता. आरसीबीचा संघ प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला एक झाडही भेट म्हणून देतो.
हे यापूर्वी कधीच घडले नाही! मैदानावरील पंचाच्या निर्णयावर मैदानाबाहेर आक्षेप, अश्विनला मोठा दंड