IPL 2023, GT vs PBKS: गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 153 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. पंजाबचा कर्णधार शिखर धवनही स्वस्तात बाद झाला. गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत पंजाबच्या फलंदाजांना ठरावीक अंताराने तंबूत पाठले. मॅथ्यू शॉर्ट याने पंजाबकडून सर्वाधिक धावांची खेळी केली. शॉर्ट याने 24 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. तर शाहरुख खान याने 9 चेंडूत 22 धावा ठोकत पंजाबला सन्मानजक धावसंख्या उभारुन दिली. गुजरातला विजयासाठी 153 धावांची गरज आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. प्रभसिमरन याला दुसऱ्याच चेंडूवर शमीने तंबूत पाठवले. त्यानंतर फॉर्मात असेलला शिखर धवनही लवकरच बाद झाला. शिखर धवनला जोशवा लिटल याने आठ धावांवर बाद केले. त्यानंतर मॅथ्यू शॉर्ट आणि भानुका राजपक्षे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण राशिद खान याने ही जोडी फोडली. राशिद खान याने मॅथ्यू शॉर्ट याला 36 धावांवर बाद केले. मॅथ्यू शॉर्ट याने 24 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला.
मॅथ्यू शॉर्ट बाद झाल्यानंतर युवा जितेश शर्मा याने भानुका राजपक्षे याच्यासोबत पंजाबच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण मोहित शऱ्मा याने जितेश शर्मा याला बाद करत ही जोडी फोडली. जितेश शऱ्मा याने 23 चेंडूत 25 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले. जितेश थंबूत परतल्यानंतर अल्जारी जोसेफ याने भानुका राजपक्षे याचा अडथळा दूर केला. राजपक्षे याने 26 चेंडूत 20 धावांची खेळी केली.
अखेरच्या षटकात सॅम करण याने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. पण मोहित शर्मा याने सॅम करन याला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. सॅम करन याने एक चौकार आणि एका षटकारासह 22 धावांचे योगदान दिले. शाहरुख खान याने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. शाहरुख खान याने 9 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले. शाहुख खान याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. पण धाव घेण्याच्या प्रयत्नात शाहरुख धावबाद झाला. शाहरुखच्या फिनिशिंग टचमुळे पंजाबचा संघ 150 पार पोहचला. हरप्रीत ब्रार याने पाच चेंडूत 8 धावांचे योगदान दिले.
हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवता ठरावीक अंतरावर पंजाबच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. पंजाबच्या फलंदाजांना एकही मोठी भागिदारी करु दिली नाही. पंजाबकडूनची सर्वात मोठी भागिदारी 37 धावांची झाली. यावरुनच गुजरातच्या गोलंदाजांची कामगिरी समजू शकतो. पंजाबकडून मोहित शर्मा याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या आहेत. मोहित शर्मा याने तीन चार षटकात 18 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. राशिद खान, अल्जारी जोसेफ, जोशुआ लिटल आणि मोहम्मद शामी यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.