Indian Premier League : आयपीएल 2022 मध्ये दररोज अफलातून सामने आणि खेळाडूंचा दमदार खेळ पाहायला मिळत आहे. बुधवारी देखील रोमहर्षक सामन्यात गुजरातने हैदराबादला 5 विकेट्सनी मात दिली. पण यावेळी पराभूत संघ हैदराबादचा वेगवान गोलंदाज उम्रान मलिकने (Umran Malik) त्याच्या वेगाने साऱ्यांचीच मनं जिंकली. त्याने 5 महत्त्वाच्या विकेट्स नावे केल्या. दरम्यान त्याच्या यशामागे हैदराबादचा बोलिंग कोच डेल स्टेनचा (Dale Steyn) मोठा हात आहे. स्टेननेच त्याला एक गुरुमंत्र दिला ज्यामुळे उम्रान ही कामगिरी करु शकला. 


उम्रानने या यशानंतर या यशामागील कारण सांगताना डेलने दिलेला गुरुमंत्र सांगितलं. डेल स्टेनने त्याला, 'लाईन-लेंथवर लक्ष नको देऊ, फक्त जमेल तितक्या वेगात टाक', असा सलाल दिला होता. ज्यामुळे उम्रानने कमाल वेगात गोलंदाजी करत समोरच्या फलंदाजांना सळो की पळो केलं. उम्रानने सामन्यात 4 ओव्हर गोलंदाजी करत केवळ 25 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने सर्व महत्त्वाचे विकेट्स घेतले. ज्याच गुजरातचा विकेटकीपर ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, डेविड मिलर आणि अभिनव मनोहर यांचा समावेश आहे. कोणत्याही अनकॅप्ड गोलंदाजाचं आयपीएलमधील हे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरलं.


'पहिल्यांदाच पराभूत संघाकडे प्लेयर ऑफ द मॅच'


कोणत्याही क्रिकेट सामन्यानंतर जिंकणाऱ्या संघातील खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ज्यालाच आयपीएलमध्ये प्लेयर ऑफ द मॅच असंही म्हटलं जातं, ते अवार्ड दिलं जातं. पण बुधवारच्या सामन्यात मात्र साऱ्यांनाच आश्चर्यचकीत करणारी गोष्ट घडली. सामना पराभूत झाल्यानंतरही सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) उम्रान मलिकला प्लेयर ऑफ द मॅच अवार्ड देण्याक आलं. सामन्यात त्याने अफलातून गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतले, ज्यामुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला. 


'उम्रानला लवकर भारतीय संघात स्थान द्या'


उम्रानच्या या दमदार कामगिरीनंतर सर्व क्रिकेट जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनीही तो लवकरच भारतीय संघात जाग मिळवेल असं म्हटलं आहे. तर रवी शास्त्री आणि केविन पीटरसन यांनीही उम्रानला इंग्लंड दौऱ्यात संधी मिळावी असं वक्तव्य केलं आहे. 


हे देखील वाचा-