IND Vs SA: आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला भारताशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने 16 जणांचा संघ जाहीर केला आहे. एनरिच नोर्किया संघात परतला आहे. तर, ट्रिस्टन स्टब्सला (Tristan Stubbs) प्रथमच संघात स्थान मिळालं आहे. दक्षिण आफ्रिकेनं जाहीर केलेल्या संघामधील काही खेळाडू भारतात आयपीएल खेळत आहेत. दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

इंग्लंड दौऱ्यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, केएल राहुल, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांचा समावेश केला जाऊ शकतो. तर, त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत संधी मिळू शकते. या मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. तसेच तिलक वर्मा, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंहला संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. 

भारत- दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक- 

सामना तारिख ठिकाण
पहिला टी-20 सामना  9 जून दिल्ली
दुसरा टी-20 सामना 12 जून  कटक
तिसरा टी-20 सामना 14 जून विशाखापट्टनम
चौथा टी-20 सामना 17 जून राजकोट
पाचवा टी-20 सामना 19 जून बंगळुरू

दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वॅन डर डसन, मार्को जॅनसेन.


हे देखील वाचा-