MI vs SRH, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (MI vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. दोघांचंही यंदाच्या हंगामातील आव्हान संपलं आहे. पण शेवट गोड करण्यासाठी आज दोन्ही संघ विजयासाठी सर्व प्रयत्न करणार आहे. गुणतालिकेचा विचार करता मुंबईने आतापर्यं 9 तर हैदराबादने 7 सामने गमावले आहेत. गुणतालिकेत दोघेही अनुक्रमे दहाव्या आणि आठव्या स्थानी आहेत.


दोन्ही संघ आजवर आयपीएलमध्ये 17 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी अतिशय अटीतटीची लढत दिली आहे. पण मुंबईने (MI) एक सामना अधिक जिंकत 9 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैदराबादने (SRH) 8 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. पण यंदा मुंबईचा फॉर्म अधिक खराब असल्याने आजच्या सामन्यात नेमकं काय होईल? हे पाहणं औत्सुक्याचं राहिल. आतापर्यंतचे सामने आणि खेळाडूंचा फॉर्म पाहता कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष्य असेल पाहूया...


मुंबई विरुद्ध हैदराबाद अशी असेल ड्रीम 11 (MI vs SRH Best Dream 11)


विकेटकीपर- ईशान किशन, निकोलस पूरन


फलंदाज- तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, रोहित शर्मा 


ऑलराउंडर- एडन मार्करम, डॅनियल सॅम्स


गोलंदाज- भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, जसप्रीत बुमराह. 


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. इतर मैदानांच्या तुलनेत वानखेडेची सीमारेषा काहीशी छोटी असल्याने चौकार-षटकारांची बरसात याठिकाणी होते. त्यामुळे मोठी धावसंख्या उभा राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आजचा सामना दुपारच्या सुमारास असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये दवाची अडचण देखील होणार नाही. म्हणूनच नाणफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेण्याची दाट शक्यता आहे.


हे देखील वाचा-