IPL 2022 Point Table: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईच्या संघानं निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईनं 12 पैकी 9 सामने गमावले आहेत. तसेच मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. त्यानंतर गुरुवारी रात्री मुंबईविरुद्ध पराभवानंतर चेन्नई सुपरकिंग्ज देखील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीत स्थान निश्चित करणारा गुजरात टायटन्स एकमेव संघ आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ 20 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, लखनौ सुपर जायंट्स तिसऱ्या आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. 

आयपीएल 2022 मध्ये गुजरातची दमदार कामगिरी
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात हैदराबादच्या संघान 13 पैकी 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 20 गुणांसह (+0.391) गुजरातचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. आयपीएल 2022 च्या प्लेऑमध्ये स्थान निश्चित करणारा गुजरातचा एकमेव संघ आहे. गुजरातनंतर लखनौ, राजस्थान आणि बंगळुरूच्या संघांचा टॉप-4 मध्ये समावेश आहे. राजस्थानचे 8 सामने जिंकून 16 गुण (+0.304)  झाले आहेत. त्यानंतर लखनौचा संघ 16 गुणांसह (+0.262) तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दिल्लीचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्लीचे 14 गुण (+0.255) आहेत. 

आयपीएल 2022 गुणतालिका:

क्रमांक संघ सामने विजय पराभव नेट रन रेट गुण
1 गुजरात टाययन्स 12 9 3 0.376 18
2 लखनौ सुपर जायंट्स  12 8 4 0.385 16
3 राजस्थान रॉयल्स 12 7 5 0.228 14
4 रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू 12 7 5 -0.115 14
5 दिल्ली कॅपिटल्स 12 6 6 0.210 12
6 सनरायजर्स हैदराबाद 11 5 6 -0.31 10
7 कोलकाता नाईट रायडर्स 12 5 7 -0.057 10
8 पंजाब किंग्ज 11 5 6 -0.231 10
9 चेन्नई सुपरकिंग्ज 12 4 8 -0.181 8
10 मुंबई इंडियन्स 12 3 9 -0.613 6

 

दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या संघानं पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतर चेन्नईच्या संघानं चार वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबादच्या संघान प्रत्येकी दोन-दोन वेळा आयपीएलचं जेतेपद जिंकलं आहे. तर, राजस्थान रॉयल्सनं आयपीएलचा पहिला खिताब जिंकला होता. पहिल्या हंगामातील अंतिम सामन्यात राजस्थाननं चेन्नईचा पराभव केला होता. 

हे देखील वाचा-