IPL 2022: आयपीएल 2022 च्या 64 व्या सामन्यात काल (16 मे) दिल्लीच्या संघानं पंजाब किंग्जला 17 धावांनी पराभूत केलं. दिल्लीच्या विजयात मिचेश मार्श आणि शार्दूल ठाकूरनं महत्वाची भूमिका बजावली. या विजयानंतर प्लेऑफची शर्यत खूपच रंजक बनली आहे. आतापर्यंत केवळ गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करू शकला आहेत. तर, चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. परंतु, मुंबईच्या संघाला त्यांचे उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत.  मुंबई इंडियन्सच्या सामन्यावर बंगळुरूचं भवितव्य अवलंबून असेल. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये स्थान मिळण्याची शक्यतामुंबईचा संघ त्यांचा अखेरचा सामना 21 मे ला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात मुंबईच्या संघानं दिल्लीला पराभूत केल्यास बंगळुरूच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा उंचावतील. तसेच बंगळुरूला त्यांच्या अखेरच्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करणं अनिवार्य असेल. मुंबईनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा शेवटचा लीग सामना गमावला, बंगळुरूच्या प्लेऑफच्या आशा धुळीस मिळू शकतात.

आयपीएल 2022 गुणतालिका-

क्रमांकसंघसामनेविजयपराभवनेट रन रेटगुण
1गुजरात टाययन्स12930.37618
2लखनौ सुपर जायंट्स 12840.38516
3राजस्थान रॉयल्स12750.22814
4रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू1275-0.11514
5दिल्ली कॅपिटल्स12660.21012
6सनरायजर्स हैदराबाद1156-0.3110
7कोलकाता नाईट रायडर्स1257-0.05710
8पंजाब किंग्ज1156-0.23110
9चेन्नई सुपरकिंग्ज1248-0.1818
10मुंबई इंडियन्स1239-0.6136

 

बंगळुरूचा नेट रनरेट अतिशय खराबलखनौ सुपर जॉइंट्सचे सध्या 16 गुण आहेत. मात्र, तरीही लखनौचा संघ प्लेऑफमध्ये जागा निश्चित करू शकला नाही. लखनौचा संघ त्यांचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर लखनौच्या संघाचं प्लेऑमधील स्थान पक्क होईल. बंगळुरूचे 14 गुण आहेत. परंतु, त्यांचा नेट रन रेट खूपच खराब आहे. त्यामुळं बंगळुरूला प्लेऑफसाठीचा आपला दावा मजबूत करण्यासाठी गुजरातविरुद्ध सामना जिंकावा लागेल. एवढेच नव्हेतर, मुंबईच्या संघाला त्यांच्या अखेरच्या सामन्यात दिल्लीला पराभूत करणं गजचेचं आहे. 

हे देखील-