Shikhar Dhawan Debut in Acting: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्वांचा लाडका गब्बर आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंक व्हिलाच्या रिपोर्टनुसार, धवन त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. एवढेच नव्हेतर, शिखर धवननं त्याच्या पहिल्या चित्रपटाचं शूटिंगही पूर्ण केलं आहे. मात्र, या चित्रपटाचे शीर्षक अद्याप समोर आलेलं नाही.


शिखर धवन नेहमीच कलाकारांचा आदर करताना दिसला आहे. यादरम्यान, अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्याची संधी मिळाल्यावर त्यानं लगेच होकार दिला. निर्मात्यांना शिखर धवन देखील या भूमिकेसाठी परफेक्ट वाटला.  काही महिन्यांपूर्वी निर्मात्यांनी या भूमिकेसाठी गब्बरशी संपर्क साधला होता. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांत झळकत आहे. 


राम सेतुच्या सेटवरही दिसला होता शिखर धवन
शिखर धवन गेल्या वर्षाच्या अखेरीस अक्षय कुमार स्टारर चित्रपट राम सेतूच्या सेटवर दिसला होता. या चित्रपटात अक्षर कुमार व्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा प्रमुख भूमिकेत होता. राम सेतुच्या सेटवर शिखर धवन दिसल्यानंतर तो चित्रपटाचा एक भाग असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. विशेष म्हणजे, शिखर आणि अक्षय हे जवळचे मित्र आहेत. फक्त अक्षय कुमारला भेटण्यासाठीच शिखर धवन राम सेतुच्या सेटवर गेला होता. 


आयपीएल 2022 मध्ये शिखर धवनची चमकदार कामगिरी
आयपीएलच्या पंधरावा हंगाम शिखर धवनसाठी खास ठरला आहे. यंदाच्या हंगामात त्यानं 13 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 38.27 च्या सरासरीनं आणि 122.74 च्या स्ट्राईक रेटनं 421 धावा केल्या आहेत. यादरम्यान, शिखरच्या बॅटमधून तीन अर्धशतक झळकली आहेत. यंदाच्या हंगामात 88 धावा त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. 


हे देखील वाचा-