बंगळुरु : आयपीएलच्या 17 (IPL 2024) व्या पर्वात अविश्वसनीय कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (Royal Challengers Bengaluru) प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) पराभूत करत बंगळुरुनं ही किमया करुन दाखवली. डब्ल्यूपीएलचं विजेतेपद बंगळुरुच्या टीमनं मिळवलं होतं. टीम इंडियाची आणि बंगळुरुची क्रिकेटर श्रेयंका पाटील (Sheryanka Patil) हिनं आरसीबीच्या विजयानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये तिनं विराट कोहलीचं एक वाक्य लिहिलं आहे. याशिवाय तिनं आरसीबीच्या प्लेऑफमधील प्रवेशाचं गणित मांडणारे फोटोज पोस्ट केलेत. या पोस्टमधून आरसीबीला हिणवऱ्यांना देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 


बंगळुरुचा संघ 3 मेपूर्वी गुणतालिकेत दहाव्या स्थानावर होता. त्यानंतर आरसीबीनं सलग सहा मॅच जिंकत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलंय. बंगळुरु आयपीएलच्या गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर असताना सोशल मीडियावर काही फोटो फिरत होते. त्यामध्ये बंगळुरु कशा प्रकारे प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकते याबाबतची समीकरणं मांडली जात होती. त्यावेळचे फोटो श्रेयंका पाटील हिनं पोस्ट केलेत. 


श्रेयंका पाटीलनं तिच्या ट्विटमध्ये विराट कोहलीचं वाक्य पोस्ट केलंय. "1 टक्के संधी असते तेच तुमच्यासाठी काहीवेळा चांगलं असतं"  असं विराट कोहील म्हणाला होता. हे पोस्ट करत असताना श्रेयंकाने आरसीबीच्या प्लेऑफमधील प्रवेशाचं समीकरण मांडणारे फोटो पोस्ट केले आहेत. श्रेंयका पाटील पुढं म्हणते,हे फोटो ज्यावेळी पसरवले जात होते त्यावेळी आमच्यावर हसणाऱ्या सर्वांसाठी, अजूनही उशीर झालेला नाही. आरसीबीच्या ट्रेनमध्ये उडी मारा, तुम्ही क्रेझी राईडचा भाग असाल. 


श्रेयंका पाटील हिचं ट्विट 






रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील मॅच पाहण्यासाठी श्रेयंका पाटील डब्ल्यूपीएलमधील बंगळुरुच्या टीममधील इतर सहकाऱ्यांसोबत एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचली होती. यावेळी तिनं विराट कोहली, फाफ डु प्लेसिस आणि इतर खेळाडूंची भेट घेतली. 


बंगळुरुची अविश्वसनीय कामगिरी


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरनं चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करुन प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. आरसीबीनं आतापर्यंत नऊवेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. यावेळी आरसीबीला विजेतेपद मिळवण्याची चांगली संधी आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर बंगळुरुनं दमदार कमबॅक करुन दाखवलंय. आता आरसीबीला 2024 चं आयपीएल जिंकायचं असल्यास पुढील तीन मॅच जिंकाव्या लागणार आहेत. 


फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहलीच्या जोडीला ही कामगिरी करण्यात यश येतं का ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्लेऑफमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सन रायजर्स हैदराबादनं प्रवेश केलेला आहे.


संबंधित बातम्या : 


RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ


Virat Kohli IPL 2024 Record: विराट कोहलीने इतिहास रचला; आयपीएलमध्ये मोठा टप्पा गाठला