Shikhar Dhawan : भारतीय क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू, डावखुऱ्या हाताचा दमदार फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) कायमच त्याच्या स्फोटक फलंदाजीसाटी ओळखला जातो. शिखरने आतापर्यंत अनेक सामन्यांत दमदार कामगिरी करत एक सलामीवीर म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. यंदा आयपीएलमध्ये तो पंजाब संघातून दमदार फलंदाजी करत असून नुकतच त्याने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली होती.  पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Punjab Kings Vs Chennai Super Kings) सामन्यात  शिखर धवनने अर्धशतक झळकावल आयपीएलमध्ये 6000 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर आता गुजरात विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावत तो आणखी एका विक्रमाजवळ पोहोचला आहे.


शिखरने झळकावलेलं हे अर्धशतक त्याच आयपीएलमधीूल 47 वं अर्धशतक असून त्याने दोन शतकंही झळकावली आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये त्याने 49 वेळा 50 हून अधिक धावसंख्या केली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये 50 हून अधिक धावसंख्या सर्वाधिक वेळा करणाऱ्यांच्या यादीत शिखर दुसऱ्या स्थानावर असून यामध्ये पहिल्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने 57 वेळा 50 हून अधिक धावसंख्या केली आहे. दरम्यान शिखर केवळ 7 अर्धशतक वॉर्नरच्या मागे असून तो ही कामगिरी देखील पूर्ण करु शकतो. 


आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार शिखरच्या नावावर


आयपीएलमध्ये शिखर धवननं आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर 675 चौकारांची नोदं आहे. त्यानंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो. त्यानं आयपीएलमध्ये 555 चौकार मारले आहेत. तसेच 534 चौकारांसह डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे.


पंजाबने घेतलं विकत


आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी दिल्लीच्या संघानं शिखर धवनला रिलीज केलं. त्यानंतर पंजाब किंग्जनं त्याला 8.25 कोटीत विकत घेऊन संघात सामील केलं. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शिखर धवननं 7 सामन्यांमध्ये 30. 57 च्या सरासरीनं 214 धावा केल्या आहेत. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. 


हे देखील वाचा-