IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत अनेक खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करून दाखवली आहे. यंदाच्या हंगामात काही असे खेळाडू आहेत, ज्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. परंतु, या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत या खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे. यंदाच्या हंगामात एका षटकात कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक धावा केल्या आहेत? त्यांची नावे जाणून घेऊयात. या यादीत एका भारतीय फलंदाजाचाही समावेश आहे. 


आयपीएलचा पंधरावा हंगामा असला तरी प्रेक्षकांमधील उत्साह अजूनही कमी झालेला नाही. या हंगामात एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकल्यास कोलकाताचा नाईट रायडर्सचा पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर आहे.डॅनियल सॅम्सच्या षटकात त्यानं 34 धावा कुठल्या. तर, या यादीत पंजाब किंग्जचा खेळाडू लिव्हिंगस्टोन दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या षटकात त्याने 28 धावा कुठल्या.


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात एका षटकात सर्वाधिक धावा करणारा टॉप 5 खेळाडूंच्या यादीत  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू  दिनेश कार्तिक हा एकमेव भारतीय आहे. या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स मुस्तिफुझर रहमानच्या षटकात त्यानं 28 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जचा लियाम लिव्हिंगस्टोन आणि डेवॉल्ड ब्रेविसनेही राहुल चहरच्या षटकात 28 धावा केल्या होत्या.त्यामुळं लिव्हिंगस्टोन, कार्तिक आणि ब्रेविस यांचा संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर विचार केला जाईल. तर, राजस्थानचा आक्रमक फलंदाज जोस बटलर या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्यानं एका षटकात 26 धावा चोपल्या आहेत. 


हे देखील वाचा-