LSG vs GT : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 57 वा सामना आहे. या सामन्यात लखनौ सुपरजांयट्स आणि गुजरात टायटन्स (LSG vs GT) हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरले असून गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा हटके निर्णय घेतला आहे. हटके यासाठी कारण सामना सायंकाळच्या सुमारास असूनही दुसऱ्या डावात दवाची अडचण होण्याची शक्यता असतानाही गुजरातने हा निर्णय घेतला आहे. पण प्रथम फलंदाजी करुन मोठी धावसंख्या निर्माण करुन लखनौवर दबाव आणण्याची रणनीती हार्दिकच्या टोळीची असेल. 



आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता दोन्ही संघातून दोन नवे खेळाडू पदार्पण करणार आहेत. यावेळी लखनौकडून करन शर्मा आणि गुजरातकडून साई किशोर मैदानात उतरेल. गुजरातने आज एकूण तीन बदल केले आहेत. मॅथ्यू वेड संघात परता आहे. लॉकी फर्ग्यूसन विश्रांतीवर आहे. तर पदार्पण करणाऱ्या साई किशोरसाठी साई सुदर्शनला विश्रांती दिली आहे. तर यश दयाल प्रदीप सांगवनच्या जागी खेळेल. लखनौने रवी बिश्नोईजागी करन शर्माला संघात घेतलं आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...


लखनौ  अंतिम 11  


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, करन शर्मा, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मोहसीन खान, दुष्मंता चमिरा, आवेश खान.


गुजरात अंतिम 11


रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, साई किशोर, यश दयाल, मोहम्मद शमी


हे देखील वाचा-