IPL 2021 Auction | बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने शाहरुख खानवर सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तमिळनाडूसाठी खेळणारा विस्फोटक फलंदाज शाहरुख खानला पंजाब किंग्सने 5.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. त्याची बेस प्राइज 20 लाख रुपये होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शाहरुखने सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपली धमाकेदार खेळी दाखवून सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं.







आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ख्रिस मॉरिस


साऊथ आफ्रिकेचा फास्ट बॉलिंग ऑलराउंडर ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू बनला आहे. ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. याआधी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बोली युवराज सिंह (16 कोटी) याच्यावर लावण्यात आली होती. मॉरिस यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाचा हिस्सा होता. त्याला आयपीएल 2020 च्या लिलावात RCB ने 10 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.


IPL Auction 2021 LIVE UPDATES : आयपीएलच्या लिलावासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर... 


इंग्लंडचा ऑलराऊंडर मोईन अलीला चेन्नई सुपर किंग्सने सात कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. मोईन आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा हिस्सा होता. परंतु, आता तो एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. तसेच बांग्लादेशचा स्पिन ऑलराउंडर शाकिब अल हसनला कोलकाता नाईट रायडर्सने 3.20 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. शाकिब गेल्या वर्षी आयपीएलमध्ये खेळला नव्हता. शाकिबची बेस प्राइज 2 कोटी रुपये होती.


शाकिबच्या आधी ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला 14.25 कोटी रुपयांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने खरेदी केलं आहे. मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर यांच्यात चढाओढ सुरु होती. परंतु, अखेर सर्वाधिक 14.25 कोटींची बोली लावून बंगलोरने मॅक्सवेलला आपल्या टीममध्ये घेतलं आहे.


अद्याप कोणते खेळाडू अनसोल्ड?


करुण नायर, केदार जाधव, जेसन रॉय आणि एलेक्स हेल्स यांसारख्या मोठ्या खेळाडूंना अद्याप कोणीही खरेदी केलेलं नाही. दरम्यान, दुसऱ्या सेटमध्ये या खेळाडूंवर बोली लावली जाऊ शकते.


महत्त्वाच्या बातम्या :