हैदराबाद : आयपीएलच्या 17 व्या पर्वातील 57 वी मॅच सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जाएंटस यांच्यात पार पडली. या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं लखनौ सुपर जाएंटसचा 10 विकेट आणि 52 बॉल शिल्लक राखून पराभव केला. या पराभवापूर्वी लखनौ सुपर जाएंटसला कोलकाता नाईट रायडर्सकडून 98 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. लखनौच्या सलग दोन पराभवानंतर त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश अडचणीत आला आहे. लखनौला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आता राहिलेल्या दोन मॅच मोठ्या फरकारनं जिंकाव्या लागतील. हैदराबादच्या सलामीवीरांनी दहाव्या ओव्हरमध्येच मॅच संपवल्यानंतर संघमालक संजीव गोएंका संतापले दिसून आले. संजीव गोएंका यांनी ऑन कॅमेरा केएल राहुलवर राग व्यक्त केला. गोएंका यांच्या या कृतीमुळं चाहते संतापलेले दिसून आले. 


हैदराबादकडून पराभव स्वीकारल्यानंतर संजीव गोएंका ऑन कॅमेरा केएल राहुलवर संतापलेले दिसून आले. यावेळी केएल राहुल त्यांच्यासमोर हतबल दिसून आला. गोएंका केएल राहुलवर संताप व्यक्त करत असतानाच तिथे टीमचे कोच जस्टीन लँगर पोहोचला त्यानंतर राहुल तिथून निघून गेला. जरी गोएंका काय म्हणत होते हे स्पष्ट होऊ शकलं तरी त्यांच्या हावभावांवर ते संतापलेले होते असं दिसून आलं. 




संजीव गोएंकावर टीकेची झोड


केएल राहुलसोबत संजीव गोएंका ज्या प्रकारे वागले त्यावरुन त्यांच्यावर क्रिकेट चाहते भडकले आहेत. काही नेटकऱ्यांनी निराशा दाखवण्याचा आणि खेळाडूंशी चर्चा करण्याची एक पद्धत असते. ती गोष्ट गोएंकांनी ध्यानात घेतली नाही. मनोज तिवारी या एक्स प्लॅटफॉरमवरील यूजरनं गोएंकांची कृती अनप्रोफेशनल होती, असं म्हटलं. तर दुसऱ्या एका यूजरनं गोएंका खेळ भावना विसरले, मोठ्या पराभवानंतर आजपर्यंत कोणत्याही संघ मालकानं अशी कृती केली नव्हती, असं म्हटलं. 






काही नेटकऱ्यांनी केएल राहुल हा टीम इंडियाचा खेळाडू असून तो तुमचा नोकर नसल्याचं म्हटलं आहे. गोएंका यांनी त्यांचं रागावरील नियंत्रण गमावलं. काही गोष्टी असतील तर त्याबाबत त्यांनी त्या ड्रेसिंग रुममध्ये चर्चा करायला हवी होती, असं आणखी एका यूजरनं म्हटलं.






लखनौ सुपर जाएंटसनं हैदराबाद विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 विकेटवर 165 धावा केल्या होत्या. ही धावसंख्या सनरायजर्स हैदराबादनं केवळ 58 बॉलमध्ये गाठली. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा या दोघांनी हैदरबादला वादळी खेळी करत विजय मिळवून दिला. लखनौला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुढील दोन सामन्यांमध्ये मोठा विजय मिळवावा लागेल. 


संबंधित बातम्या : 


SRH vs LSG : आम्ही पुन्हा येतोय, लखनौच्या धुलाईनंतर ट्रेविस हेड अन् अभिषेक शर्माचा व्हिडीओ जारी, हैदराबादनं विरोधी संघांचं टेन्शन वाढवलं


KL Rahul : संघमालकानं ऑन कॅमेरा सुनावलं, तू तात्काळ लखनौची टीम सोड, केएल राहुलकडे कुणी केली मागणी,काय घडलं? पाहा व्हिडीओ