Robin Uthappa Record : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (CSK vs SRH) या आयपीएलच्या 2022 (IPL 2022) 46 व्या सामन्यात चेन्नईचा अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) विक्रमी कामगिरी करु शकतो. उथप्पा आजच्या सामन्यात केवळ एक अर्धशतक ठोकल्यास आयपीएल कारकिर्दीतील 5000 धावा पूर्ण करु शकतो. आतापर्यंत 4950 धावा केलेल्या उथप्पाने आजच्या सामन्यात अवघ्या 50 धावा करताच 5000 धावांचा टप्पा ओलांडू शकतो. 


चेन्नईचा अनुभवी खेळाडू रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) हैदराबादविरुद्ध आज 5000 आयपीएल धावा पूर्ण करु शकतो. त्यासाठी त्याला 50 धावा ठोकायच्या आहेत. कारण आयपीएलमध्ये त्याने आजवर 201 सामन्यात 4950 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 27 अर्धशतकं ठोकली आहेत. दरम्यान आज तो 5 हजार धावा पूर्ण करताच आयपीएलमध्ये हा टप्पा ओलांडणारा सातवा खेळाडू होऊ शकतो. या दरम्यान 88 धावा हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विचार करता कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. 217 सामन्यात 6469 रन त्याने केले असून त्याच्या नावावर 5 शतकं आणि 43 अर्धशतकं आहे. तिसऱ्या स्थानावर शिखर धवन 6 हजार 91 रन आणि रोहित शर्माच्या नावावर 5 हजार 766 धावा आहेत.


चेन्नईची सुमार कामगिरी


चेन्नई संघासाठी यंदाचा हंगाम अतिशय खराब सुरु आहे. त्यांनी 8 पैकी केवळ 2 सामने जिंकत 4 गुणांसह नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. दरम्यान आजचा त्यांच आव्हान हैदराबादला पुढील सामन्यात एन्ट्रीसाठी महत्त्वाचं असेल. दोघांच्या आतापर्यंतच्या लढतीत चेन्नईचं पारडं जड असलं तरी यंदा हैदराबादचा फॉर्म चांगला असल्याने सामना चुरशीचा होऊ शकतो.




हे ही वाचा -